वर्धा : चोंडी शिवारात काळविटाची मटण पार्टी; चौघे ताब्यात

काळविटाची शिकार (Hunting) करून सुरू असलेल्या मटण पार्टीवर वनविभागाने छापा (Raid) टाकला.
Arrest
ArrestSakal
Updated on

वर्धा : काळविटाची शिकार (Hunting) करून सुरू असलेल्या मटण पार्टीवर वनविभागाने छापा (Raid) टाकला. यात मटणावर ताव मारणाऱ्या चार जणांना अटक (Arrest) करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (ता. १७) देवळी तालुक्यातील भिडी गावानजीक असलेल्या चोंडी शिवारात करण्यात आली.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांची नावे विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजीत जगदीश टामटे, सुरेंद्र वाघमारे सर्व रा. चोंडी असे असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्याजवळून काळविटाची कातडी, पकडण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन जाळ्या. मटन कापण्यासाठी उपयोगात आणलेले दोन सुरे, व शिजवलेले मटन जप्त करण्यात आले.

Arrest
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, ही क्षुल्लक गोष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, देवळी तालुक्यातील भिडी गावानजीक असलेल्या चोंडी शिवारात काळविटाची शिकार करून त्याच्या मटणाची पार्टी सुरू असल्याची माहिती वनविभाला मिळाली. त्या आधारे सापळा रचून वनविभागाचे एक पथक रवाना झाले. माहितीत असलेल्या जागेवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा मारला असता विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजीत जगदीश टामटे, सुरेंद्र वाघमारे हे मटणावर ताव मारत असल्याचे दिसून आले. त्यांच्या ताब्यातून काळविटाच्या कातडीसह आतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याना आज वनकोठडी मिळविण्यासाठी पुलगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

शिकार करणारे रॅकेट सक्रीय

बिबटाची शिकार करून कातडी तस्करी करणाऱ्या प्रकरणाला आठवडा पूर्ण झाला नाही तोच काळविटाच्या मटणावर ताव मारण्याची घटना उघडकीस आली. यामुळे जिल्ह्यात वन्य प्राण्याची शिकार करणारे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय बळावला असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.