तळेगाव (शा.प), कारंजा : विधानसभा निवडणूक तोंडावर येताच आर्वी विधानसभा क्षेत्रात वातावरण चांगलेच गरम होते. सध्या आर्वी विधानसभा क्षेत्रात आमदार दादाराव केचे यांनी जनतेच्या हितासाठी आलेला निधी रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामुळे चांगलाच असंतोष पसरला आहे. त्यांच्या या पत्राचा आर्वी, आष्टी, कारंजा या तिनही तालुक्यातील चांगलाच निषेध नोंदविण्यात येत आहे. आता तर तसे बॅनेरही कारंजा शहरात झळकले आहे.
आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील सोशल मीडियावर आमदारांच्या निषेधाची वॉर सुरू आहे. तर कारंजा येथे तर संतापलेल्या नागरिकांनी आमदार दादाराव केचे यांच्या निषेधाचे बॅनरच लावले आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून देशात एक नंबरचा पक्ष म्हणून प्रचिती असलेल्या भाजपची येथे चांगलीच नाचक्की होत आहे.
शहराच्या विकासासाठी आमदार दादाराव केचेंनी नऊ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी रद्द करण्याची मागणी लावून धरल्याने व निधी रद्द न झाल्यास थेट राजीनामच देण्याची धमकी देवेंद्र फडणवीस यांनाच केल्याने त्यांच्या विरोधात या भागातील नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
निधी रद्द करण्याची मागणी एक लोकप्रतिनिधी कसे काय करू शकतात असा प्रश्न करून आमदार दादाराव केचेंनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यातील जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहे.
बॅनरमध्ये व सोशल मीडियावर चर्चा
कारंजा शहराला मिळालेला निधी आर्वीकरिता वळता करा अशी मागणी करणाऱ्या नेत्याला आमदार म्हणून राहायचा अजिबातच अधिकार नाही. वय झाले असेल तर निवृत्ती घ्या आणि घरी बसा अशा आशयाचे मोठे बॅनर सध्या कारंजा येथे झळकत आहे. तर संताजी महाराज सभागृहासाठी एक कोटी मिळालेला निधी रद्द करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदाराचा निषेध, अश्या प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.