शेंगांमध्येच फुटतोय दाण्यांना अंकुर : शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

शेंगातील दाण्यातून अंकुर बाहेर पडत आहेत. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे.
soyabean
soyabean sakal
Updated on

धानला : मौदा तालुक्यासह परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेंगातील दाण्यातून अंकुर बाहेर पडत आहेत. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सततच्या वर्षीप्रमाणे यंदा कशीबशी फक्त २३००हेक्टरपर्यंतच सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली. परंतु मागील आठ दहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने शेतीची कामे करण्यास चांगलीच दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन कापणीवर येत असून, अचानक सुरू होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना त्याची रास करण्यास अडचणी येत आहेत. निसर्गाने यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास सततच्या पावसामुळे हिरावून घेतला. काही ठिकाणी तर पावसाच्या सरीनेच शेंगा फुटत असल्याने दाणे जमीन पडून अंकुर वापत चालले आहेत.

soyabean
कन्हैय्या कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? राहुल गांधींची घेतली भेट

सततच्या पावसामुळे आधीच सोयाबीनमधीला तण व्यवस्थापन करता आले नाही. सोबतच काही दिवसांपूर्वी विषाणूजन्य बुरशीचा प्रकोपामुळे काही प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. मात्र उर्वरित पिकांची गुणवत्ता अधिक असली तरी सततच्या पावसामुळे ती सुद्धा मार खात असल्याने अधिकचे भाव मिळणे सुद्धा कठीण असल्याने शेतकरी विवेचनात पडले आहेत.

यंदाची दिवाळी गोड करावी या आशेने असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पावसाने पाणी फेरले असून डिओसीची आयात यामुळेही सोयाबीनचे भाव पडले व यात आता गुणवत्ता खालावल्याने पुन्हा भाव कमी होणार, म्हणजे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

आठ दहा दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा सोयाबीन पिकाची गुणवत्ता चांगली होती. तण अधिक असल्याने एकरी १० पोते होणारे पीक ७ ते ८ पोत्यावर आले. पण या सततच्या पावसाने शेंगमध्ये बी वापर असल्याने ४ पोतीही उत्पन्न होणे कठीण आहे. भाव कमी कमी होत असल्याने आर्थिक चिंता वाढली आहे. सतत होणाऱ्या नुकसानीतून सावरण्यासाठी सरकारने आम्हा शेतकऱ्यांबद्दल योग्य मार्ग काढावा.

- लक्ष्मण गाढवे, सोयाबीन शेतकरी, वढना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.