Vidarbha : अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पात मुबलक जलसाठा; पावसाचा आणखी एक महिना शिल्लक

वर्षी प्रकल्पात १०० टक्के साठा होईल असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
Vidarbha
Vidarbhasakal
Updated on

अमरावती - जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढत जुलै महिन्यात झालेल्या पावसाने विभागातील सिंचन प्रकल्पात ६४ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाला आहे. महिनानिहाय जलसाठ्याची कमाल मर्यादा राखण्यासाठी काही प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.

पावसाचा आणखी एक महिना शिल्लक आहे. यावर्षी प्रकल्पात १०० टक्के साठा होईल असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. या पाणीसाठ्यामुळे आगामी काळातील पाणीपुरवठा व रब्बी हंगामातील सिंचनाची सोय झाल्याने सध्यातरी चिंता मिटली आहे.

Vidarbha
Nagpur News : ‘त्या’ अहवालामुळे नागपूर जिल्हा परिषद येणार अडचणीत...

अमरावती विभागात नऊ मोठे, २७ मध्यम

२४५ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून पाणीपुरवठा व सिंचनाची सोय करण्यात येते. यंदा मॉन्सून लांबणीवर जाण्यासोबतच जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. पाणलोट क्षेत्रात पावसाची तूट आल्याने व उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण वाढल्याने चिंता वाढली होती.

जुलै महिन्यातील पावसाने मात्र ही चिंता मिटवण्यासोबतच आश्वस्त केले. विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित १३९९ दलघमी पाणीसाठ्याच्या तुलनेत ८८० दलघमी (६२ टक्के) साठा प्रत्येकी २ टक्के साठा आहे. झाला. बुलडाणा जिल्हा मात्र यास अपवाद असून या जिल्ह्यातील तीनही मोठ्या प्रकल्पांतील साठा अद्याप ५० टक्केही

झालेला नाही. नळगंगा प्रकल्पात १८ दलघमी (२६ टक्के), पेनटाकळीमध्ये २७ दलघमी (४६ टक्के) व खडकपूर्णा प्रकल्पांत ४ दलघमी (५ टक्के) साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात ८१ टक्के साठा झाला असून त्याच्या तीन दरवाजांमधून ९४ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

Vidarbha
Mumbai Crime: अंधेरीत सेफ्टी टँकमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ; शरिरावरील जखमांमुळं हत्येचा गुन्हा

यवतमाळमधील पूस ७८ टक्के, अरुणावती ७६ टक्के व बेंबळा प्रकल्पांत ३३ टक्के जलसाठा झाला आहे. तर, अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा व वान प्रकल्पांत प्रत्येकी २ टक्के साठा आहे.

विभागातील २७ मध्यम प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव अकोला जिल्ह्यातील उमा वाशीम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पांत शंभर टक्के साठा झाला आहे.

यवतमाळमधील निगुर्णा व नवरगाव शंभरी गाठण्याच्या जवळपास आहेत. विभागातील मध्यम प्रकल्पात सद्यःस्थितीत ५०२ दलघमी साठा झाला असून प्रकल्पीय जलसाठ्याच्या तुलनेत तो ६५ टक्के आहे.

Vidarbha
Nagpur News : सर्वेक्षणात १० हजार हेक्टरची तफावत; कृषी ४० तर महसूल नुसार ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

एकूण २४५ लघू प्रकल्प असून बुलडाणा वगळता उर्वरित चारही जिल्ह्यातील लघू प्रकल्पांत समाधानकारक जलसाठा झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील ४५ प्रकल्पात १४५ दलघमी, यवतमाळमधील ६५ मध्ये २०१, अकोल्यातील २४ मध्ये ६६, बुलडाण्यातील ३७ मध्ये ३० दलघमी व वाशीम जिल्ह्यातील ७४ लघू प्रकल्पांत

१५५ दलघमी पाणीसाठा सद्या झाला आहे. विभागात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २३ दलघमी साठा कमी झाला असला तरी आणखी ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. ऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज चांगला असल्याने पाणीसाठा शंभर टक्के होण्याचा जलसंपदा विभागाचा अंदाज आहे.

विभागातील पाणीसाठा

■ मोठे प्रकल्प (९) : ८८० दलघमी : ६२ टक्के

■ मध्यम प्रकल्प (२७) : ५०२ दलघमी : ६५ टक्के ■ लघू प्रकल्प (२४५ ) : ५९८ दलघमी : ६५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.