विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देशभरातील सातपैकी एक पीएम मित्रा पार्क तर गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित स्टील प्रकल्प उभारला जात आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन सुमारे सव्वा लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवात नागपुरातही अनेक प्रकल्प उभारले जात असून या अनुषंगाने पूरक उद्योगही उभे राहणार असल्याने विदर्भ औद्योगिक हब म्हणून पुढे येणार असल्याचा विश्वास भाजपच्या एका बड्या नेत्याने व्यक्त केला आहे.