यवतमाळ : सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस व इसापूर धरणाच्या (isapur dam) पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पावसाची आवक. यामुळे इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे पैनगंगेला पूर (painganga flood river) आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. पुलावरून पाणी वाहत असल्याने बुधवारपासून ठप्प झालेली वाहतूक अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मागील तिन दिवसापूर्वी इसापूर धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले . धरणाचे १० दरवाजे एक मिटरने, तर ३ दरवाजे दिड मिटरने उघडण्यात आले असून त्यामधून ४८ हजार २०४ क्युसेक इतक्या वेगाने पैनगंगा नदिपात्रात पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहीती उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे उपअभियंता हनुमंत धुळगंडे यांनी दिली .
इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने पैनगंगेला पूर आला. या पुराचे पाणी नदीचे पात्र सोडून शेत शिवारात घुसले. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील दोन्ही तिराच्या उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, महागाव या तालुक्यातील एकंदरीत हजारों हेक्टरमधील पिकांना बसला. परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सोयाबीनसह ऊस, कापूस आदी पिक उध्द्वस्त झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. बुधवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे तरुण कार्यकर्ते वाहन चालकांना खिचडीसह भोजन व्यवस्था करीत आहेत. अद्यापही पुलावरील वाहतूक सुरू झाली नाही. पाण्याचा प्रवाह जरी पुला खालून वाहत असला तरी पुलाची तपासणी झाल्याशिवाय वाहतूक सुरू होणार नसल्याची माहीती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.