gondia medical college
gondia medical college

Vidarbha News : मेडीकल कॉलेजमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; आयसीयूतील रुग्ण पळाला

Published on

गोंदिया : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या येथील मेडीकल कॉलेजचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आयसीयूत भरती रुग्ण सोमवारी (ता. 3) दुपारी एकच्या सुमारास आयसीयूतून पळाला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली. पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.

gondia medical college
Mumbai : डीआरआईने केलेल्या कारवाईत कोट्यवधीची कोकेन जप्त; परदेशी नागरिक अटकेत

अखेर तो रुग्ण त्याच्या घरी म्हणजेच सालेकसा तालुक्यातील तिरखेडी-जोशीटोला येथे सापडला. मेडीकल काॅलेजच्या यंत्रणेने रुग्णाला ताब्यात घेऊन मंगळवारी (ता. 4) सकाळी पुन्हा रुग्णालयात भरती करून घेतले.

तिरखेडी-जोशीटोला येथील जियालाल मन्साराम गावड (वय 55) याला रविवार, 2 जुलै रोजी येथील मेडीकल कॉलेजमधील सामान्य वाॅर्डात उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. पुढील उपचाराकरिता म्हणून सोमवार, 3 जुलै रोजी आयसीयू कक्षात नेण्यात आले. परंतु, दुपारी एकच्या सुमारास तो आयसीयू कक्षातून अचानक गायब झाला. या घटनेमुळे

मेडीकल काॅलेजच्या प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली. नातेवाइकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जियालालचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह यंत्रणा कामाला लावण्यात आली.

gondia medical college
Dilip Bankar: "...तर मी राजकारण सोडेन" जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानंतर दिलीप बनकर आक्रमक

त्याचा शोध घेत असतानाच त्याच्या नातेवाइकांना तो घरी असल्याचे लक्षात आले. ही बाब प्रशासकीय यंत्रणेलाही माहित झाली. त्यामुळे यंत्रणेने तिरखेडी-जोशीटोला गाव गाठून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात त्याची तपासणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा मेडीकल काॅलेजमध्ये त्याला भरती करून घेतले. उल्लेखनीय म्हणजे, आयसीयू विभागातून रुग्ण पळून जात असताना कोणाचेही का लक्ष गेले नाही? हा प्रश्न आहे. यावरून यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होते.

रुग्ण जियालाल गावड याला मंगळवारी पुन्हा रुग्णालयात भरती केले आहे. इंजेक्शनच्या भितीपोटी पळून गेल्याचे तो सांगत आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

- कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.