"कोरोना काळातील वीजबिल सरकारनं भरावं अन्यथा ऊर्जामंत्र्यांचं विदर्भात फिरणं कठीण करू"; विदर्भवादी संतापले

Vidarbhawadi leaders will protest in front of Nitin rauts home in Yavatmal
Vidarbhawadi leaders will protest in front of Nitin rauts home in Yavatmal
Updated on

वणी (जि. यवतमाळ)  : विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक विश्रामगृहात पार पडली. यात कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे अन्यथा वीजमंत्र्याला विदर्भात फिरणे कठीण करू, असा इशारा विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी दिला आहे. 

उद्या दुपारी बाराला नागपूर येथे विदर्भ मार्च काढण्यात येणार असून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालणार असल्याचेही चटप यांनी सांगितले.
गेले वर्षभर राज्यात कोरोनाने थैमान घातले होते. 

दरम्यान, तीन महिने टाळेबंदी करण्यात आली होती. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यापारी, लघु व्यावसायिक यांना प्रचंड मोठ्याप्रमाणात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. या महामारीच्या काळात मोठ्याप्रमाणात अनागोंदी माजलेली असताना शासन बेफिकीर होते. नागरिकांना हजारोंची विजबिले देण्यात आली. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने विविध मागण्यांसाठी विदर्भ मार्चचे रणशिंग फुंकले आहे. 

कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे, 200 युनिटपर्यंत वीजबिल माफ करावे, त्यानंतरचे वीजदर निम्मे करावे, शेतीपंपाला विजबिलातून मुक्त करावे, विदर्भाततील शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपये प्रतिहेक्‍टरी नुकसानभरपाई द्यावी तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी करीत चार जानेवारीला दुपारी 12 वाजता नागपूर येथून वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे. 

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप, कपिल इद्दे, पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, देवराव धांडे, राजू पिंपळकर, मंगेश रासेकर, संजय चिंचोळकर, सूरज महारतळे, प्रा. बाळासाहेब राजूरकर, देवा बोबाटे, रवी गौरकर, अजय विधाते, बालाजी काकडे आदीसह विदर्भवादी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.