बनावट फेसबुक अकाउंटवरून पाठविले अश्‍लील व्हिडिओ

Pornographic videos sent from fake Facebook accounts Amravati crime news
Pornographic videos sent from fake Facebook accounts Amravati crime news
Updated on

चांदूरबाजार (जि. अमरावती) : एका युवतीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून आधी अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो पाठविले. याप्रकरणात घाटलाडकी येथील युवकास ब्राम्हणवाडा पोलिसांनी अटक केली. सायबर पोलिसांची या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी ३ मार्च २०२१ रोजी युवतीने ब्राह्मणवाडा थडी ठाण्यात तक्रार दिली. एका मोबाईल क्रमांकाच्या धारकाने युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यात एक अल्पवयीन मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर अश्‍लील व्हिडिओ आणि मॅसेज पाठविणे सुरू केले. शिवाय फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी युवकाने पीडितेला दिली. पीडितेच्या तक्रारीवरून ब्राम्हणवाडा पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ब्राह्मणवाडा थडी व सायबर पोलिसांनी सदर युवकाचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक वळवी, रवींद्र शिंपी, दिनेश वानखडे, सचिन भुजाडे यांच्या पथकाने संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. चौकशीअंती त्याने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अश्‍लील व्हिडिओ व फोटो पाठवून बदनामी केल्याची कबुली तपास अधिकाऱ्यांपुढे दिली. 

फ्रेंड रिक्वेस्ट किंवा लिंक स्वीकारू नका
मोबाईलवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट किंवा काही लिंक आल्यास ती स्वीकारू नये, शिवाय अनोळखी व्यक्तीच्या कॉलवर माहिती देण्याचे टाळावे.
- सायबर पोलिस,
अमरावती ग्रामीण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()