Maharashtra Vidhansabha 2019 : राळेगावात दोन सरांमध्ये होणार लढत

File photo
File photo
Updated on

राळेगाव (जि. यवतमाळ) : राळेगाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे हमखास लालदिवा असे समीकरणच आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात सलग चौथ्यांदा दोन सरांमध्ये सामना होण्याची शक्‍यता आहे. भाजपने आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची उमेदवारी जाहीर केली असून, कॉंग्रेसकडून माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे नाव आघाडीवर आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मंत्रिपदाच्या निमित्ताने कायमच लालदिवा राहिला आहे. अलीकडच्या काळात या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागत असल्याची म्हण रूढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते पहिल्यांदाच निवडून आले व थेट कॅबिनेट मंत्रीही झालेत. यापूर्वी माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सलग चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना दुसऱ्या प्रयत्नात मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. त्यांनाही थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद, विधानसभेचे उपाध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत. गेल्या 20 वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राळेगावला कायमच लालदिवा मिळाला आहे. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असला तरी पूर्वीपासूनच या मतदारसंघात उच्चशिक्षित उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. माधवराव भलावी हे शिक्षक होते. नेताजी राजगडकर हे उच्च विद्याविभूषित होते. प्रा. पुरके हे प्राध्यापक, तर डॉ. उईके हे प्राचार्य आहेत. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव व आमदार उच्चविद्याविभूषित असल्याने राज्यात सरकार कुठल्याही पक्षाचे असो मंत्रिमंडळामध्ये मतदारसंघाला कायम लालदिवा राहिला आहे. अलीकडच्या काळात निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना मंत्रिपदाचे डोहाळे लागतात. कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात राळेगावची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. भाजपने आज आपली यादी जाहीर केली. त्यात राळेगाव मतदारसंघामधून पुन्हा उईके यांना संधी दिली आहे. त्यामुळे यंदाही दोन्ही सरांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते.
वंचित बहुजन आघाडीने माधव कोहळे यांना उमेदवारी दिली तेही शिक्षक आहेत. तर "प्रहार'कडून गुलाबराव पंधरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे.

दोन प्राध्यापक, एक शिक्षक
भाजपने विद्यमान आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कॉंग्रेसकडून प्रा. वसंत पुरके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे जवळपास निश्‍चित आहे. वंचित बहुजन आघाडीकडून माधव कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ते शिक्षक आहेत. त्यामुळे दोन प्राध्यापक व एक शिक्षक यांच्यात लढतीचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.