Farmer Success Story : पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून रेशीम उत्पादनातून युवा शेतकऱ्याची भरारी

silk farming success story in marathi : हिंगणघाट तालुक्यातील आर्वी छोटी येथील युवा शेतकरी विद्याधर खोडे यांनी १० लाखांचे भरघोस रेशीम उत्पादन घेतले.
young farmer success story 10 lakhs revenue from silk farming
young farmer success story 10 lakhs revenue from silk farmingSakal
Updated on

वर्धा : निसर्गाचा लहरीपणा कधी अस्मानी तर सुलतानी संकट यातून हातातोंडाशी आलेले पीक हातातून जात होते. म्हणून पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून हिंगणघाट तालुक्यातील आर्वी छोटी येथील युवा शेतकरी विद्याधर खोडे यांनी १० लाखांचे भरघोस रेशीम उत्पादन घेतले.

रेशीम उद्योग सुरू करण्यापूधी श्री. खोडे हे खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, तूर अशा पारंपरिक पिकांची लागवड करून उत्पादन घेत होते. परंतु, खर्च वजा हाती काही शिल्लक राहत नव्हते. यांनतर त्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करावा म्हणून भाजीपाला पीक घेण्यास सुरवात केली. परंतु, अनेकदा अवकाळी पावसाचा फटका बसून हाती आलेले पीक उद्धवस्त होत होते.

शेतकरी विद्याधर खोडे यांना रेशीम शेतीची माहिती भोजराज खोडे व अरूण जगताप यांच्याकडून मिळाली. त्यांनी याची सविस्तर माहिती घेतली. सन २०२१-२२ मध्ये मनरेगा अंतर्गत रेशीम तूती लागवड करून रेशीम शेती करण्यास सुरवात केली.

पहिल्याच वर्षी पहिल्या पिकामध्ये ९५ किलो कोष उत्पादन करून निव्वळ नफामधून ५५ हजार रुपयांमध्ये कोष विक्री केली. कच्चे ताडपत्रीचे किटक संगोपनातून विक्रमी कोष उत्पादन करून नफा मिळविला. श्री. खोडे यांनी मिळविलेला नफा अनेकांना रेशीम शेती करण्यास प्रोत्साहित करणारा ठरत आहे.

मनरेगातून बांधले संगोपनगृह

मनरेगा योजनेमधून त्यांनी पक्के किटक संगोपनगृह बांधकाम करून चार ते पाच बॅचेस मधून प्रत्येक बॅचेसला ८० ते ९० हजार रूरुपयांचा आर्थिक मोबदला कमवित आहेत. आजघडीला त्यांच्याकडे १२ बॅचेस असून त्यामधून १० लाखांचे वार्षिक उत्पन्न घेत आहेत.

मनरेगा योजनेतून श्री. खोडे यांना मिळालेली आर्थिक साथ यामुळे त्यांचा शेती करण्याचा दृष्टिकोन बदलेला असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. श्री. खोडे यांनी रेशीम शेतीमध्ये केलेली प्रगती पाहून गावातील अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.