चंद्रपूर : मदत व पुनर्वसन मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) यांच्या पुढाकाराने चंद्रपुरातील दारूबंदी (liquor ban lift in chandrapur) उठविण्यात आली आहे. २७ मे रोजी निर्णय झाल्यानंतर आता ५ जुलैला जिल्ह्यातील सर्व बार सुरू झाले आहेत. मात्र, याचा आनंद कोण कसा साजरा करेल याचा नेम नाही. एका बार मालकाने तर विजय वडेट्टीवारांचा फोटो थेट बारमध्ये (vijay wadettiwar photo in bar) लावला आणि त्याचा पूजा देखील केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा रंगली आहे. (vijay wadettiwar photo worship by bar owner in chandrapur)
भाजप सरकारच्या काळात 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपुरात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची म्हणणे होते. त्यांनी दारूबंदी उठविण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर २०१९ ला महाविकास आघाडीची सत्ता आली आणि वडेट्टीवारांना चंद्रपूरचं पालकमंत्री पद मिळालं. त्यानंतर २७ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्यात आली. त्यावेळी विरोध देखील झाला. मात्र, मद्यपींना चांगलाच आनंद झाला होता.
उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केलेले दारू परवाने 3 ठिकाणाहून सिंगल विंडो पद्धतीचा वापर करत अत्यंत विद्युतगतीने पूर्ण केले. मद्य शौकिनांसाठी प्रतीक्षा असलेल्या या बाबीसाठी ५ जुलैला जिल्हाभरात 100 हून अधिक बार रेस्टॉरंट आणि काही दारू दुकाने सुरू झाली. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने 490 परवानेधारकांपैकी चौकशीनंतर 98 दारू परवाने नियमित करून मान्यता प्रदान केली. अखेर ६ वर्षानंतर मद्यपींनी पुन्हा एकदा आनंद व्यक्त केला.
बार सुरू होताच चंद्रपूर-मूल मार्गावरील बार मालक गणेश होरडवार यांनी बारमध्ये चक्क वडेट्टीवारांचा फोटो लावत त्याची पूजा आणि आरती केली. 'ज्याच्यामुळे आमचे पोट भरते तेच आमचे देव. आज त्यांच्यामुळे आमचे पोटा-पाण्याचे दुकानं सुरू झाली. त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला. त्यामुळे वडेट्टीवारांनी धन्यवाद देण्यासाठी मी त्यांचा फोटो लावला असल्याचे होरडवार यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.