घुग्घुसवासियांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, पालिकेसाठी सर्वपक्षीय चक्काजाम

villagers agitated for separate corporation in ghuggus of chandrapur
villagers agitated for separate corporation in ghuggus of chandrapur
Updated on

घुग्घुस (जि. चंद्रपूर ) :   घुग्घुस नगर परिषदेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झाला आहे. त्यामुळे पालिकेसाठी घुग्घुसवासी आक्रमक झाले आहेत. आज सोमवारला सर्वपक्षीय नेत्यांनी चक्काजाम आंदोलन केले. 

घुग्घुस नगरपरिषदेची पहिली अधिसूचना 31 ऑगस्टला जाहीर झाली. राज्यातील मुदत संपलेल्या चौदा हजार ग्रामपंचायत आणि  चंद्रपूर तालुक्‍यातील 38 ग्रामपंचायतच्या निवडणुका 15 जानेवारीला होऊ घातल्या आहेत. यात घुग्घुस ग्रामपंचायतचाही समावेश आहे. 23 डिसेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यात ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामांकन दाखल करण्यात येणार आहे. अद्यापही घुग्घुस ग्रामपंचायतसाठी एकही नामांकन आलेले नाही. 

दरम्यान, तहसीलदार नीलेश गौड यांनी सर्वपक्षीय नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. उलट नेते पालिकेच्या मागणीला घेऊन आणखी आक्रमक झाले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 28 डिसेंबरला घुग्घुस येथील बस स्थानक परिसरात चक्का जाम करण्यात आले. त्यामुळे बराच काळ या परिसरातील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दंगा नियंत्रण पथक तैनात होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर सोडून देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.