स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावाला जोडणारा रस्ता होता खराब; अखेर गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय 

villagers build roads of village by their own in Amaravati district
villagers build roads of village by their own in Amaravati district
Updated on

जामली ( जि. अमरावती ) ः चिखलदरा तालुक्‍यातील अतिदुर्गम भागातील डोमी हे 65 घरे असलेले गाव. या गावातील लोकांना स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षे उलटल्यानंतरही मूलभुत सुविधेकरिता झटावे लागत आहे. गावाला जाणारा मुख्य रस्ता खराब झाल्यामुळे ग्रामसभा घेऊन चार किलोमीटर रस्ता गावातील नागरिकांनी दुसऱ्यांदा खोदकाम करून तयार केला.

मेळघाटातील अतिदुर्गम भागांतील डोमी गावात जाण्यासाठी रास्तच नाही. आज ना उद्या प्रशासन रास्ता बांधून देईल या प्रतीक्षेत असलेल्या डोनिवासीयांच्या पदरी निराशाच आली. परंतु त्यामुळे खचून न जाता त्याची श्रमदानातून रस्त्याचे खोदकाम व बांधकाम पूर्ण केले. 

तालुक्‍यातील अतिदुर्गम भागांतील रुईपठार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार किलोमीटरवर डोमी गाव आहे. मागील सहा महिन्यांपासून रुईपठार ग्रामपंचायतीचा ग्रामसचीव बेपत्ता असल्याचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामविकासाचा खेळखंडोबा झाला आहे. तालुक्‍यातील राहू, बिबा, सरिता, सुमीता, एकताई, पिपल्या, हिलंडा, खारी, भांडूम, अशी अनेक गावे आजही विकासापासून कोसो दूर आहेत.

अखेर ग्रामस्थांनी स्वतःच रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला व डोमी गावात दुसऱ्यांदा श्रमदानातून रस्ता बांधण्यात आला. यापूर्वीही मध्यप्रदेशात जाण्याकरिता श्रमदानातून रस्ता तयार करण्यासाठी आदिवासी कुटुंबांनी पुढाकार घेतला होता. 

रस्त्यासाठी श्रमदान करणाऱ्यांमध्ये अशोक धिकार, पतीराम बेठेकर, बासू धिकार, भैयालाल कास्देकर, रामदास कास्देकर, हब्बू बेठेकर, संजय बेठेकर, अंकुश बेठेकर आदी ग्रामस्थांचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.