Video : पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनीच पकडली मोहाची दारू... आरोपीला केले पोलिसांच्या स्वाधीन

file photo
file photo
Updated on

चंद्रपूर : दारूबंदीच्या जिल्ह्यात इतर ठिकाणाहून विदेशी दारू येत नसल्याने गावठी दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एका ठिकाणात बनवलेली मोहाची दारू गावोगावी पोहोचवली जात आहे. मात्र, पोलिसांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

यामुळे त्रस्त कोठारी गावाच्या नागरिकांनी स्वतःच दारूसाठ्यासह दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गावकऱ्यांनाच हे करावे लागत असेल; तर पोलिस नेमके काय करीत आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मोहाच्या दारूला प्रचंड मागणी

सध्या विदेशी दारू जिल्ह्यात येत नसल्याने मोहफुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या गावठी दारूला प्रचंड मागणी आली आहे. ही दारू पूर्वीच्या किमतीपेक्षा पाच ते सहा पट जास्त किमतीने विकली जात आहे. ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक वेगळी यंत्रणाच तयार झाली आहे.

कारवाई होत नसल्याच आरोप

यात ग्रामीण भागातील काही प्रतिष्ठित लोक, राजकीय पदाधिकारी आणि पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. या यंत्रणेच्या आशीर्वादाने दारूचा गोरखधंदा जोमात सुरू आहे. त्यामुळे अशा तस्करीवर कुठलीही कारवाई होत नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे.


दुचाकीवरून आणली गावठी दारू

आज अशाचप्रकारे दारूतस्करी केली जात असताना गावकऱ्यांनी याचा पर्दाफाश केला. एक पुरुष आणि त्याच्या मागे महिला हातात पोते घेऊन दुचाकीने गावात आले. एमएच 34 बीए 8936 या दुचाकीने येत असताना गावकऱ्यांनी त्यांना थांबविले. यावेळी पुरुष आरोपी घटनास्थळावरून पसार झाला; तर महिला हाती लागली. याची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूतस्करीचे प्रमाण वाढत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.