Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Amravati Stone Pelting On Police Station: जमावाने पोलिसांच्या दहा वाहनांची तोडफोड केली. त्यात काही दुचाकींचा सुद्धा समावेश आहे. शनिवारी (ता. पाच) परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता होती.
Image of damaged police station. Amravati violence. Mob pelts stones at police station, injuring personnel
Amravati Stone Pelting on Police Station By MobEsakal
Updated on

अमरावती: शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर शुक्रवारी (ता. चार) रात्री जमलेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस अधिकारी व कर्मचारी, असे २१ जण जखमी झाले.

जमावाने पोलिसांच्या दहा वाहनांची तोडफोड केली. त्यात काही दुचाकींचा सुद्धा समावेश आहे. शनिवारी (ता. पाच) परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता होती.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादस्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रात्री नागपुरी गेट ठाण्यावर काही जण पोहोचले.

जमावाला आधी पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. नागरिकांनी सार्वजनिक सण, उत्सवाच्या काळात शांतता स्थापण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त, अमरावती

जमावातील काही लोकांनी अचानक दगडफेक केल्याने वातावरण चिघळले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यानंतर जमावातील मुख्य २६ जणांसह हजार ते बाराशेच्या आसपास लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, असे नागपुरीगेटचे ठाणेदार हनमंत उरलागोंडावार यांनी सांगितले.

जखमींमध्ये एसआरपीएफ अमरावती शहर पोलिस, क्यूआरटी पथक, होमगार्ड जवानांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने रात्रीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परिसरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून काही भागांत फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.

Image of damaged police station. Amravati violence. Mob pelts stones at police station, injuring personnel
Nagpur : 200 लाडक्या बहिणींशी ‘अशी ही बनवाबनवी’, स्वयंरोजगाराची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात, निधी नसल्याचे शासनाचे कारण

जमावबंदीचे आदेश

पोलिस ठाण्यावर व वाहनांवर झालेल्या दगडफेकीमध्ये जवळपास पाच ते सहा लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. जमावबंदीचे आदेश लागू असून, परिसरात शांतता आहे. ज्यांच्याविरुद्ध जमावाचा आक्षेप होता त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे, असे ठाणेदार हनमंत उरलागोंडावार यांनी सांगितले.

Image of damaged police station. Amravati violence. Mob pelts stones at police station, injuring personnel
Health : सावधान...तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे उडवतात आरोग्याचा धुव्वा,अभ्यासातून निरीक्षणः फुफ्फुसाला इजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.