wardha Abortion Case : कदमांचे व्हाया अमरावती राजकीय कनेक्शन

अमरावती येथील मोठ्या राजकीय नेत्याच्या दबावामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही
Abortion
Abortion sakal
Updated on

वर्धा : येथील कदम रुग्णालयात उघड झालेल्या अवैध गर्भपातामुळे (wardha abortion case) राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला राजकीय पाठबळाची चर्चा असतानाच हे राजकीय कनेक्शन (Political connections) व्हाया अमरावती असल्याचे पुढे आले आहे. येथील तत्कालीन पालकमंत्र्याच्या माध्यमातून या रुग्णालयाचा अनागोंदी कारभार बिनबोभाटपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.

कदम रुग्णालयात (Kadam Hospital) सुरू असलेल्या कारभाराची माहिती आरोग्य संचालनालयाला असल्याचे येथील आरोग्य विभागातून सांगण्यात येत आहे. असे असताना त्यांच्याकडून या रुग्णालयात करवाई करण्यात आली नाही. यामुळे हे कनेक्शन किती पक्के हे सहज लक्षात येते. एवढेच नाही तर अकोला, अमरावती आणि आर्वी येथे सेवा देणाऱ्या एका डॉक्टरचेही हात यात गुंतल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Abortion
Netflix चा वापरकर्त्यांना झटका; मात्र, भारतीयांसाठी आनंदाची बातमी

या विरोधात आरोग्य संचालनालयात तक्रार केली असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. हा सर्व प्रकार राजकीय दबावातून झाल्याचा आरोप होत आहे. आर्वीच्या या गर्भपात केंद्रात केवळ आर्वीच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातीलही गर्भपात होत असल्याचा संशय बळावत आहे. यात हात असलेल्या अनेक डॉक्टरांमुळे नागपूर ते अकोला या मार्गावरील जिल्ह्यासाठी हे रुग्णालय मध्यवर्ती गर्भपात केंद्र असल्याचे पुढे येत आहे.

आतापर्यंत झालेल्या कारवाईत १२ कवट्या आणि ५४ हाडे जप्त करण्यात आली आहेत. त्याचे परीक्षण रासायनिक विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. तर कदम रुग्णालयात असलेल्या नोंदवहीत केवळ आठ गर्भपात केल्याची नोंद आहे. यामुळे अतिरिक्त दिसत असलेल्या चार कवट्या कुठल्या या संदर्भात चौकशी सुरू आहे.

Abortion
भावासमोर बहिणीवर बलात्कार अन् बहिणीने उचलला टोकाचा पाऊल

या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात डॉ. रेखा कदम, दोन परिचारिका आणि अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांचा समावेश आहे. डॉ. रेखा कदम यांच्या सासू शैलजा कदम यांचाही यात समावेश असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने अटक केली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नागपूरच्या चमूकडून औषधांची तपासणी

कदम रुग्णालयात (Kadam Hospital) गर्भपातासाठी वापरण्यात येत असलेले औषध हे शासकीय असल्याचा दावा पीसीपीएनडीटी समितीच्या वतीने करण्यात आला आहे. नागपूर येथील चमूकडून या रुग्णालयात असलेल्या औषधसाठ्याची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीअंती औषधाचे सत्य पुढे येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Abortion
बनावट दारू पिणे भोवले! नशेत नऊ जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर
आरोग्य विभागात सुरू असलेल्या या प्रकरणाची तक्रार आरोग्य संचालनालयात करण्यात आली होती. यात अमरावती येथील मोठ्या राजकीय नेत्याच्या दबावामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आता हे प्रकरण उघड झाले आहे. यामुळे यावर कारवाईची अपेक्षा आहे.
- अनिल वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.