Wardha Constituency Lok Sabha Election Result: वर्ध्यात पवारांचा डाव यशस्वी, अमर काळे विजयी; काँग्रेसला हिणवणारे फडणवीस तोंडघशी

Wardha Lok Sabha Election Result 2024 BJP Ramdas Tadas defeats by NCP Sharad Pawar candidate Amar Kale : रामदास तडस विरुद्ध अमर काळे अशी या ठिकाणी चुरशीची लढत झाली.
Wardha Lok Sabha Election Result 2024 BJP Ramdas Tadas NCP Sharad Pawar Amar Kale
Wardha Lok Sabha Election Result 2024 BJP Ramdas Tadas NCP Sharad Pawar Amar Kale
Updated on

Wardha Lok Sabha Election Result 2024 : महात्मा गांधींचा पदस्पर्श लाभलेल्या वर्ध्या जिल्हा हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या दोन टर्म इथं भाजपचा खासदार निवडून आला. पण आता पुन्हा ही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीकडं आली आहे. इथं विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार अमर काळे हे विजयी झाले आहेत.

यंदा पहिल्यांदाच इथं काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. खरंतर या ठिकाणी आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे हे मुळचे काँग्रेसचेच आहेत. त्यामुळं इथं काँग्रेसचं पंजा हे चिन्ह नसलं तरी उमेदवार मात्र काँग्रेसचाच आहे. तर दुसरीकडं मोदी लाटेत २०१४ पासून दहा वर्षे रामदास तडस हे इथं निवडून आले होते.

वर्धा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघांची स्थिती

वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन मतदारसंघ येतात. या सहा विधानसभा मिळून जिल्ह्यात सरासरी ६४.८५ टक्के मतदान झाले. पम २०१९ लोकसभेच्या तुलनेत झालेल्या या वाढीव मतदान अमर काळे यांच्या पथ्यावर पडलं आहे.

२०१९ मध्ये काय होती स्थिती?

गेल्या निवडणुकीत अर्थात सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वर्ध्यात ६१.५३ टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत यंदा म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढलं असून ते ६४.८५ टक्के इतकं झालं आहे.

बलाबल कसं होतं?

भाजप - रामदास तडस - ५,७८,३६४ मतं

काँग्रेस - चोरुलता टोकस - ३,९१,१७३

वंचित - धनरजा वंजारी - ३६,४५२

बसपा - शैलेशकुमार अग्रवाल - ३६,४२३

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

वर्ध्यात तेली आणि कुणबी उमेदवार अशी लढत आहे. जातीय समिकरणं या ठिकणी नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात तशीच स्थिती यंदाही होईल. पण यंदाच्या निवडणुकीत पुढील मुद्दे विशेष गाजले.

  • ऐनवेळी उमेदवार आयात केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यात असंतोष

  • तिकीट नाकारल्याने समीर देशमुख, राजू तिमांडे यांची नाराजी

  • काँग्रेसचा उमेदवार नसल्याने काँग्रेसचा परंपरागत मतदार उदासीन

  • कापूस, सोयाबीनला नसलेला हमीभाव, रखडलेली अवकाळी पिकाची नुकसान भरपाई

  • गत दहा वर्षात न आलेले उद्योग, रखडलेले रेल्वे उड्डाण पूल

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची तळेगाव येथे झालेली सभा

  • काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही

वर्धा लोकसभेच्या विधानसभा क्षेत्रात झालेलं मतदान

अर्वी विधानसभा - ६८.९८

देवळी - ६५.६१

धामनगाव रेल्वे - ६१.७१

हिंगणघाट - ६५.९१

मोर्शी - ६५.०१

वर्धा - ६२.५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.