विदर्भात पुन्हा येणार महापूर? इसापूर धरणातून पाण्याचा प्रचंड विसर्ग; विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला

water discharge from Isapur dam in yavatmal district
water discharge from Isapur dam in yavatmal district
Updated on

शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ):  पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणातील जलसाठ्यात मोठी आवक झाली आहे. त्यामुळे धरणाच्या 13 वक्रदरवाज्यांद्वारे नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या पुलावरून पाच फुटांपेक्षा अधिक पाणी वाहत आहे. त्यामुळे शेंबाळपिंपरी-हिंगोली हा राज्यमार्ग आज सकाळी नऊपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून, नदीकाठच्या शेतीतील ऐनकाढणीत आलेल्या सोयाबीन व इतर पिकांची मोठी नासाडी झाली आहे.

सध्यास्थितीत धरण 100 टक्के भरले असून, धरणाची नऊ वक्रदरवाजे एक मीटर व चार दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आली असून, नदीपात्रात 36 हजार 954 क्‍युसेक्‍य प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दर तासाला पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पातून इसापूर धरणात येणाऱ्या पाण्याची आगाऊ सूचना इसापूर येथील नियंत्रण कक्षाला मिळत असते. त्यावरून विसर्गाचे प्रमाण ठरविण्यात येते. परंतु, आवक व त्या प्रमाणात करावयाचा विसर्ग यात समन्वय नसल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.

याबाबत देवगव्हाण (जुने) येथील 15 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुसद येथील तहसीलदार यांना विसर्गामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाईसाठी सोमवारी (ता.21) निवेदन दिले. परिणामी अधिकाऱ्यांच्या या नियोजनशून्यतेचा फटका कास्तकारांना बसल्याचा आरोपही समितीने तक्रारीत केला आहे.

गेल्या 2006मध्ये धरणातील प्रचंड जलविसर्गामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आता अचानक वाढविण्यात आलेल्या विसर्गामुळे कास्तकारांची चिंता अधिकच गडद झाली आहे. देवगव्हाण जुने व इसापूर परिसरातील अनेक शेतजमिनी पाण्याने डबडबल्या असून, काहींची पिके खरडून गेली आहेत. कापणीसाठी तयार सोयाबीन पिकाचे या विसर्गामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. म्हणून शासनाने नुकसानीचे पंचनामे करीत त्वरित मदत देण्याची मागणी देवगव्हाण व इसापूर परिसरातील कास्तकारांनी "सकाळ'शी बोलताना केली.

पाणलोट क्षेत्रातील भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणातील आवक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आवकनुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाची हीच परिस्थिती कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- हनुमंत धुळगंडे,
विभागीय अभियंता, इसापूर प्रकल्प.

संपादन - अथर्व महांकाळ  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()