Water Shortage : निधी मंजूर तरी, ‘जला’लखेडा तहानलेले; निधी मंजूर पण जलजीवन मिशन अपूर्ण

नळाद्वारे पाणी पिण्याचेसुद्धा पाणी मिळत नसल्याने गावकरी त्यांच्या भागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरून पाणी आणून तहान भागवित आहेत.
water shortage in jalalkheda village
water shortage in jalalkheda villagesakal
Updated on

जलालखेडा - नरखेड तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या ‘जला’लखेडा गाव हे मुबलक पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी पाणीटंचाई होती. पण मागील काही काळापासून नागरिकांना पाणीटंचाई ला समोर जावे लागले नाही. भविष्यात पाणी टंचाई होऊ नये यासाठी जल जीवन मिशन योजनेंतर्गत लाखों रुपयांचा निधी मंजूर असून कामे वेळेत न झाल्याने पुनर्वसित गावातील गावकऱ्यांना मागील आठ दिवसांपासून कूपनलिका ‘ड्राय’ झाल्याने पाणीटंचाईला समोरा जावे लागत आहे.

जलालखेडा ते पाच वॉर्ड व १३ सदस्य असलेले गाव महत्वाचे गाव आहे. वर्धा व जाम नदीने गाव वेढले असून पाण्याची समस्या जाणवत नाही. पण आठ दिवसांपूर्वी पुनर्वसित भागाला म्हणजेच वॉर्ड क्रमांक ४ व ५ ला पाणीपुरवठा करणारे दोन बोअरवेल ‘ड्राय’ झाल्याने त्या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

नळाद्वारे पाणी पिण्याचेसुद्धा पाणी मिळत नसल्याने गावकरी त्यांच्या भागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरून पाणी आणून तहान भागवित आहेत. या रणरणत्या उन्हाळ्यात त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.भविष्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी जल जीवन मिशन योजनेंतर्गत या गावात ३७५ लाख रुपयांची पाणीपुरवठाची कामे मंजूर असून कासवगतीने कामे होत आहेत. याकडे संबंधित विभागाचा दुर्लक्षितपणामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

बोअरवेल ‘ड्राय’ झाल्याने अचानक पाणीटंचाई निर्माण झाली. यावर तोडगा काढण्याचे ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. यासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने त्यासाठीच्या सर्व मंजुरी देखील मिळविण्यात आली आहे. बोअरवेल फल्स करण्याचे नियोजन आहे. यात यश मिळाले तर लगेच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अन्यथा दुसरा बोअरवेल करून पाणीपुरवठा करण्यात येईल.

- बाबाराव गोरे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, जलालखेडा

गावात पुनर्वसित गाव म्हणजे वॉर्ड क्रमांक ४ व ५ मध्ये मागील आठ दिवसांपासून अल्पसा पाणीपुरवठा होत असून दिन बकेट ही पाणी मिळत नाही. ग्रामपंचायत संपूर्ण आपल्या अंतर्गत वादात गुंतली असून ग्रामविकास अधिकारी देखील याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यांचे संपूर्ण लक्ष कर कसा ३० टक्के वाढून गावकाऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसवता येईल याकडे लागले आहे. पण गावकऱ्यांच्या समस्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही.

- योगेश त्रिपाठी, गावकरी, वॉर्ड क्रमांक ४, पुनर्वसन, जलालखेडा

‘पाणी टंचाईवर उपाययोजना करा’

खापरखेडाः सावनेर पंचायत समितीचे उपसभापती राहुल तिवारी यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधीत विभागास निवेदन करुन तालुक्यातील पाणीटंचाई असणाऱ्या गावातील गावकऱ्यांकरिता पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सावनेर तालुक्यातून वाहणाऱ्या कोलार नदीच्या काठी असलेल्या भागीमाहेरी, हेटी, भदी पीपळा, ऐरणगाव, जैतपूर, परसोडीसह इतर गावात पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे.

तालुक्यातील इतर ग्रामपंचायत अथवा तहसील स्तरावर सर्वेक्षण करुन पाणीटंचाई असणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीव्दारे कोलार नदीवर बांधण्यात आलेले बंधारे आटले असल्याने गावकऱ्यांना पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे.

शासनाद्वारे नदीत पाणी सोडणे, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे, टँकर व्यवस्था उपलब्ध करुण देण्यात यावी, अश्या मागणीचे पत्र मलीक विराणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोक्कुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.