अटकेनंतर त्यांच्याजवळ सापडला देशी कट्टा, तलवार आणि बराच मुद्देमाल! वाचा नेमके काय...

crime
crime
Updated on

चंद्रपूर : अनेक गुन्हे करून ते सतत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळत होते. अनेक दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. अखेर पोलिसांना त्यांचा सुगावा लागला आणि पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केल्याची सिनेस्टाईल घटना नुकतीच घडली.

घरफोडी, मंदीर चोरी आणि अशा बऱ्याच गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेले दोन आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागले आहेत. माजरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुटाळा परिसरातून अटक केली. यावेळी देशी, विदेशी कट्टा, जिवंत काडसूत, तलवार या शस्त्रांसह चारचाकी वाहन जप्त केले. शाहरुख अस्लम शेख (वय 22, रा. माजरी), राकीब सगीर अहमद सिद्दीकी (वय 20, रा. माजरी) अशी अटकेतील गुन्हेगारांची नावे आहेत.

शाहरुख अस्लम शेख, राकीब सगीर अहमद सिद्दीकी या दोघांविरुद्ध माजरी पोलिस ठाण्यात भादंवि 353, सहकलम 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. एमएच 34 के 8030 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने हे दोघे शस्त्रांसह खुटाळा परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दोघांना ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे एक विदेशी बनावटीचा कट्टा, चार जिवंत काडतुसे, एक देशी बनावटीचा कट्टा, तलवार असा शस्त्रसाठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व शस्त्र आणि वाहन जप्त केले.
एकतानगर तेलवासा येथे घरफोडी, घुग्घुस हद्दीतील मंदिरात चोरी, माजरी येथे चोरी केल्याचे या दोघांनी कबूल केले. खुटाळा येथील घराची झडती घेतली असता सोन्याचे दागिने, रोख 25 हजार, गॅस सिलेंडर, एलसीडी, होम थिएटर, 4 हजार 300 रुपयांची नाणी, दोन दुचाकी असा एकूण 5 लाख 43 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सापडला तो पोलिसांनी जप्त केला. या दोन्ही आरोपींची पोलिस कोठडीत सध्या रवानगी केली असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

सविस्तर वाचा -  खंडणीखोर कडवचा आणखी एक कारनामा उघड

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक विकास मुंढे, पोलिस उपनिरीक्षक सचिन गदादे, केमेकर, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमोल धंदरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत नागोसे, रवी पंधरे, जावेद सिद्दीकी, प्रफुल्ल मेश्राम, दिनेश यांच्या पथकाने केली.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.