अचलपूर : मेळघाटात टेलिमेडिसीन सेवा सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच बंद पडली आहे. त्यामुळे "सरकारी योजना चांगली, पण वेशीला टांगली', ही म्हण या टेलिमेडिसीनच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. सध्या मेळघाटातील टेलिमेडिसीन सेवा नावालाच उरली आहे. टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून गंभीर आजार किंवा तातडीची व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णांवर कोणते आणि कसे औषधोपचार करावेत, याबाबतचा सल्ला घेऊन रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यास मदत होते.
राज्याच्या तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून मेळघाटातील सेमाडोह आणि हरिसाल येथे टेलिमेडिसीन सेवेचा शुभारंभ केला. मात्र अल्पावधीतच ही सेवा कुचकामी ठरली आहे. या टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावे, यासंदर्भात थेट मुंबई, पुणे, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे
सोयीस्कर होत होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली टेलिमेडिसीन सेवा मेळघाटात सध्या बंद पडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सल्ला घेऊन उपचार न करता केवळ रुग्णांना रेफर करण्यातच धन्यता मानत आहेत.
एखाद्यावेळी आजारावरील उपचारासंबंधित किचकट प्रश्न निर्माण होतो. अशावेळी रुग्णांना नागपूर, मुंबई वा पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात येते. या पार्श्वभूमीवर नव्या संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे काही सुविधा विकसित केली आहे, त्यात टेलिमेडिसीन सुविधेद्वारे जगभरातील तज्ज्ञांशी संपर्क करून संबंधित रुग्णांवर काय औषधोपचार करावे, याबाबत सल्ला घेणे शक्य झाले आहे. संबंधित रुग्णांच्या आजारांची इत्थंभूत माहिती टेलिमेडिसीन यंत्रणेद्वारे तज्ज्ञांना दिल्यास ते तत्काळ संबंधित रुग्णांच्या औषधोपचाराविषयी मार्गदर्शन करतात,
परिणामी रुग्णांना इतर ठिकाणी रेफर न करता जागेवरच औषधोपचार करण्यास मदत होते. मात्र मेळघाटातील हरिसाल आणि सेमाडोह येथील टेलिमेडिसीन सेवा आजघडीला बंद झालेली आहे. मेळघाटसारख्या भागात आधुनिक सुविधेमुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा मेळघाटातील डॉक्टर तथा रुग्णांना लाभ मिळाला होता. मेळघाटमध्ये टेलिमेडिसीन सेवा खरोखरच गंभीर आणि गुंतागुंतीच्या वेळी लाभदायक असल्याचे दिसून आले. मात्र अलीकडे मेळघाटात ही सेवा बंद पडल्याने नावालाच उरली आहे.
सविस्तर वाचा - राज्यात लाचखोरीत पोलिस विभाग ‘टॉप’, तब्बल एवढ्या पोलिसांवर कारवाई
यंत्रात बिघाड
टेलिमेडिसीन केंद्रावरील यंत्रात बिघाड झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली. परिणामी मेळघाटातील टेलिमेडिसीन सेवा बंद आहे. वरिष्ठ स्तरावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
डॉ. दिलीप पांडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, मेळघाट.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.