MP Navneet Rana: नवनीत राणा धमकी प्रकरण नेमकं काय? नरेंद्र मोदी, शाह, मोहन भागवतांचा देखील उल्लेख, वाचा ग्राऊंड रिपोर्ट

MP Navneet Rana: खासदार राणा यांचे स्वीयसहायक विनोद पुंडलिक गुहे यांनी त्यासंदर्भात शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
MP Navneet Rana
MP Navneet Ranaesakal
Updated on

MP Navneet Rana:

अमरावती: जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांना आंतरराष्ट्रीय कॉल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. क्लिफ बनविणाऱ्याने असभ्य भाषेचा वापर केला असून त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांचा नामोल्लेख करून धमकी देण्यात आली आहे.

खासदार राणा यांचे स्वीयसहायक विनोद पुंडलिक गुहे यांनी त्यासंदर्भात शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गुहे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

खासदार नवनीत राणा यांच्याकडे असलेल्या आयफोनवर ३ मार्च २०२४ रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर २ वाजून ८ मिनिटांनी ऑडिओ क्लिफ आली. त्यात खासदार यांच्या नावाचा एकेरी वापर करून अश्लील भाषेचाही वापर केल्या गेला आहे. शिवाय त्या क्लिफमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री योगींसह टी. राजा यांच्याही नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.

एका विशिष्ट समाजाच्या लोकांवर ही मंडळी अन्याय करीत असल्याचा आरोप संबंधिताने केला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे अफगाणीस्तानने अमेरिकेला धडा शिकविला त्याचप्रमाणे भारताविरोधातही आम्ही आवाज उठवू, अशी धमकी त्यात देण्यात आली आहे. पहिली ऑडिओ क्लिफ ही २.५७ मिनिटांची होती. त्यानंतर त्याच दिवशी २ वाजून ९ मिनिटांनी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हाइस कॉल करून खासदार राणा यांना शिवीगाळ करण्यात आली. (Latest Marathi News)

२ वाजून १३ मिनिटांनी त्याच क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप व्हाइस कॉल आला. तो राणा यांनी रिसिव्ह केला नाही. त्यानंतर २ वाजून १४ मिनिटांनी ४ सेकंदांची क्लिफ पाठवून फोन न उचलण्याबाबतचा उल्लेख केला. २ वाजून १९ मिनिटांनी पुन्हा १ मिनीट ४ सेकंदांची ऑडिओ क्लिफ पाठविली. त्यात पुन्हा अश्लील भाषेचा वापर करण्यात आला. ३ वाजून २९ मिनिटांनी पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. तो कॉल राणा यांचे दुसरे स्वीयसहायक यांनी रिसिव्ह केला. खोडसाळपणा करून खासदार राणा यांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विनोद गुहे यांनी तक्रारीत केली आहे.

MP Navneet Rana
Riteish Deshmukh: "प्रिय अनंत, तुझे हृदय समुद्रासारखे विशाल आहे..."; रितेश देशमुखची खास पोस्ट, राधिकाबद्दल म्हणाला...

खासदार नवनीत राणा यांनी संसदेत काही जणांचा नामोल्लेख करून आपले विचार मांडले. त्यानंतर काहींनी त्यांच्यावर आरोप केले. त्यानंतर पाकिस्तान, अफगाणीस्तानच्या नावांचा उल्लेख करून धमक्या येत असतील तर संबंधित नेत्यांचा धमकी देणाऱ्यांसोबत काही संबंध आहे काय? याचा तपास करावा, अशी मागणी राज्याच्या पोलिस महासंचालक, शहराचे सीपी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे.-रवी राणा आमदार, बडनेरा मतदारसंघ, जि. अमरावती.

प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न-

सोशल मीडियावरून खासदार नवनीत राणा यांच्या फोटोचा गैरवापर करून प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने शहरातील एका संशयिताने सोशल मीडियावरून काही पोस्ट टाकून त्यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप विनोद गुहे यांनी राजापेठ ठाण्यात दाखल दुसऱ्या तक्रारीत केला आहे. त्याआधारेही संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MP Navneet Rana
Shahjahan Sheikh Handover to CBI : संदेशखालीच्या आरोपीला CBIकडं सोपवा; हायकोर्टाचे बंगाल सरकारला कडक शब्दात निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.