जंगी दारूपार्टी करून जावयाने सासुरवाडी केली क्वारंटाईन, वाचा काय झाला प्रकार... 

whole family get quarantine due to wine party of son in law
whole family get quarantine due to wine party of son in law
Updated on

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला शहरी भागापुरता मर्यादित असणारा संसर्ग आता ग्रामीण भागात पोहोचला असून, जुलै महिना मोठा रुग्णवाढीचा ठरला आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने वारंवार लॉकडाऊनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परंतु नागरिकांनी न सुधारण्याची शपथच घेतल्याचे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येते. असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला. जावयाची एक चुकी अख्ख्या सासुरवाडीला चांगलीच महागात पडली. जाणून घ्या पुढे... 

सासुरवाडीत दारूची जंगी पार्टी करणे जावयाच्या चांगलेच अंगलट आले. तसेच त्याला अटकाव न करणाऱ्या सासुरवाडीला याची शिक्षा भोगावी लागली. अख्खी सासुरवाडी क्वारंटाईन करणाऱ्या जावयावर पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. अमरावती येथून दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या बेजबाबदार वागण्यामुळे सासुरवाडीतील नागरिकांना कोरोनाची लागण झाली. प्रशासनाची दिशाभूल करणारा कोरोनाबाधित जावई आणि संबंधित कुटुंबातील सदस्यांवर नगरपालिका प्रशासन गडचांदूर यांनी गुन्हा दाखल केला आहे. 

चुकीचा पत्ता आणि संपर्क क्रमांक 

सदर रुग्ण अमरावती येथून खाजगी वाहनाने गडचांदूर शहरात दाखल झाला. त्यानंतर कोरोनाच्या (covid -) तपासणीसाठी तो कोव्हीड केअर सेंटर (सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर) येथे पोहोचला व कोव्हिडकरिता आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. चाचणी करतेवेळी आरोग्य विभागाला स्वत:चा पत्ता व दूरध्वनी क्रमांक चुकीचा दिला. आरोग्य विभाग किंवा नगर परिषदेला न कळविता परस्पर नातेवाईकाकडे निघून गेला. रुग्णांची शोधाशोध करण्यात आली, परंतु चुकीचा दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता दिल्याने संपर्क होऊ शकला नाही. 

जावयावर सासुरवाडीत गुन्हा 

नगर परिषदेद्वारे संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, सदर नागरिक कोवीड केअर सेंटरमधून परस्पर सासुरवाडीत निघून गेला. सदर रुग्णाने रात्री दारूची जंगी पार्टी केली. या पार्टीत सहभागी असलेल्या सर्वांची कोविड तपासणी करण्यात आली व सर्व नागरिकांचे सकारात्मक अहवाल आले. जावयाच्या पार्टीने संसर्गाची बाधा झाल्याने सदर व्यक्‍ती व त्याच्या नातेवाईकावर माहिती लपविणे, स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वी औरंगाबाद ते नागपूर ते गडचांदूर आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांवर स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे यावरून गुन्हा दाखल केला होता. 

दारूच्या प्रसादातून कोरोनाचा आशीर्वाद

अमरावती शहरातून आलेल्या जावयांनी सासुरवाडीतील अकरा मंडळींना दारूतून कोरोनायुक्त प्रसाद दिला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. शहरात 28 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान टाळेबंदीसुद्धा केली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या बेपर्वाईमुळे प्रशासनापुढील संकट वाढत आहे. 

संपादित : अतुल मांगे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()