वृद्ध पत्नीला सरण रचून, डिझेल टाकून जिवंत जाळले; चारित्र्यावर संशय

पत्नी सरपणाला गेल्याचे निमित्त साधून गंगारामने संशयाचा वाद चांगलाच उरकून काढला
Crime
Crimesakal
Updated on

मूल (जि. चंद्रपूर) : चारित्र्यावर संशय (Doubts over character) घेणाऱ्या वृद्ध पतीने पत्नीला रचलेल्या सरणावर ठेवून डिझेल टाकून जिवंत (Wife burned alive) जाळले. ही घटना मूल तालुक्यातील सुशी येथे मंगळवारी घडली. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुक्ताबाई गंगाराम शेंडे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर गंगाराम सोमाजी शेंडे (वय ७४) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल तालुक्यातील सुशी येथे वृद्ध शेंडे दाम्पत्य राहतात. मुक्ताबाई गंगाराम शेंडे या मंगळवारी सकाळी सरपणासाठी जंगलात गेल्या होत्या. परत आल्यानंतर मुक्ताबाई आणि गंगाराम यांच्यात वाद झाला. या दाम्पत्यामध्ये नेहमीच वादाचे खटके उडत होते. पती नेहमी वृद्ध पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

Crime
आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

पत्नी सरपणाला गेल्याचे निमित्त साधून गंगारामने संशयाचा वाद चांगलाच उरकून काढला. यातूनच पत्नीला बेदम मारहाण केली. मुक्ताबाईने आणलेल्या सरपणाचेच सरण रचले. त्यावर डिझेल टाकून गंगारामने पत्नी मुक्ताबाईला जिवंत (Wife burned alive) जाळले. जळत असलेल्या मुक्ताबाईने मदतीसाठी आरडाओरड केली. किंचाळल्याच्या आवाजामुळे गावकरी धावून आले.

अर्धवट जळलेल्या अवस्थेत गावकऱ्यांनी मुक्ताबाई यांना उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथे उपचारार्थ भरती केले. तिथून नागपूर येथे उपचारार्थ दाखल करीत असताना वरोराजवळ त्यांचा मृत्यू झाला. आरोपी गंगाराम शेंडे यांना पोलिसांनी केली आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सतीश सिंह राजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.