रिकाम्या जागांमुळे वनविभाग ‘विरळ’, वृक्षतोड रोखण्यासह वन्यजीवांच्या संवर्धनावरही प्रश्‍नचिन्ह; तब्बल तीन हजार पदे रिक्त

अवैध वृक्षतोडीने जंगल विरळ होऊ नये, ही जबाबदारी वनविभागाच्या खांद्यावर आहे. मात्र तीन हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने वनखात्याच्या कार्यालयातील कर्मचारी संख्याच ‘विरळ’ झाली आहे.
वनविभागात तीन हजार पदे रिक्त
वनविभागात तीन हजार पदे रिक्तsakal
Updated on

- अविनाश साबापुरे

यवतमाळ : अवैध वृक्षतोडीने जंगल विरळ होऊ नये, ही जबाबदारी वनविभागाच्या खांद्यावर आहे. मात्र तीन हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने वनखात्याच्या कार्यालयातील कर्मचारी संख्याच ‘विरळ’ झाली आहे. आता वनसंपदा वाचविण्यासोबतच वन्यजीवांच्या संवर्धनासाठी रिक्त पदे भरण्याचे आव्हान शासनापुढे आहे.

देशात मध्यप्रदेशनंतर सर्वाधिक जंगलव्याप्त क्षेत्र असलेले महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. एकूण ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी महाराष्ट्रात तब्बल ६१ हजार ९५२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे.

इतक्या मोठ्या जंगल क्षेत्रातील वनसंपदेसह वन्यप्राणी, जैवविविधतेची काळजी वाहण्यासाठी राज्यात वनकर्मचाऱ्यांचा तगडा फौजफाटा गरजेचा आहे. परंतु, प्राधान मुख्य वनसंरक्षकांच्या नागपूर येथील कार्यालयातून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रात एकंदर तीन हजार ९७ कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.

वनविभागात तीन हजार पदे रिक्त
Akola Corona Update : कोरोनाच्या एन्ट्रीमुळे अकोल्यातही यंत्रणा अलर्ट; लक्षणे आढळल्यास उपचार घेण्याचे आवाहन

यामध्ये मुख्य वनसंरक्षक १३, वनसंरक्षक ११, उपवनसंरक्षक ५, विभागीय वनअधिकारी ९ तर सहायक वनसंरक्षक २०१ अशी अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय पदे रिक्त आहेत. याशिवाय, वनक्षेत्रपाल ९०, कार्यालय अधीक्षकांची २९ पदे रिक्त आहेत. ३९८ लिपिक, ५४ वनपाल आणि १६८४ वनरक्षक नसतानाही वनविभागाचा कारभार कसा सुरू आहे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वाघांचा सांभाळ कसा करणार?

जगातले सर्वाधिक वाघ भारतात आहेत. तर भारतातील सर्वाधिक वाघ मध्यप्रदेशात नोंदविण्यात आलेले असले तरी मध्य प्रदेशातील काही व्याघ्रप्रकल्पांच्या सीमा महाराष्ट्राला लागलेल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात नोंदविलेल्या साडेसातशे वाघांच्या खालोखाल म्हणजे साडेचारशे वाघ महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. परंतु, वनविभागातील रिक्त पदांमुळे वाघाची शिकार, अकाली मृत्यू, तस्करी हे प्रकार वाढत चालले आहे.

वनविभागात तीन हजार पदे रिक्त
Forest Department : खिरेश्वर येथे वनविभागाच्या वतीने पर्यावरण शुल्क नाक्याची उभारणी

वनखात्यातील पदांचा गोषवारा

संवर्ग - मंजूर पदे - भरलेली पदे - रिक्त पदे

गट-अ -६०३ -३१९ -२८४

गट-ब -११०७ -९६६- १४१

गट-ब (अराजपत्रित)- १४६ -८४ -५२

गट-क -१६५१८ -१४०९२ -२४२६

गट-ड -९०८ -७२४ -१८४

एकूण -१९२८२- १६१८५- ३०९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()