महिला ओरडल्याने घाबरलेल्या वाघाने काढला पळ; मात्र, अगोदर साधला डाव

Woman killed in Gadchiroli tiger attack tiger attack news
Woman killed in Gadchiroli tiger attack tiger attack news
Updated on

गडचिरोली : सरपणासाठी जंगलात गेलेल्या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गडचिरोली लगतच्या गोगाव जंगल परिसरात शुक्रवारी (ता. २५) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. मंजुळा चौधरी (वय ६०, रा. गोगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे अवघ्या नऊ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

गडचिरोली शहरालगत चामोर्शी, धानोरा, आरमोरी मार्गावर मोठे जंगल आहे. या जंगल परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना वाघाचे व बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे वनविभागाने चारही मार्गांवर फलक लावून सावधानतेचा इशारा दिला आहे. तरीही काही महिला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जातात. त्यामुळेच नऊ दिवसांत दोन घटना घडल्या आहेत.

गडचिरोली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगाव येथील मंजुळा चौधरी ही महिला अन्य दहा ते बारा महिलांसोबत सरपणासाठी जंगलात गेली होती. दरम्यान ती लाकडे तोडत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. इतर महिलांनी आरडाओरडा करीत घटनास्थळावरून पळ काढला. महिलांच्या ओरड्याने घाबरलेला वाघही तिथून पसार झाला.

यापूर्वी गडचिरोली शहरातील इंदिरानगर येथील सुधा अशोक चिलमवार ही महिला बुधवार (ता. १६) दुपारी इतर पाच ते सहा महिलांसोबत सरपणासाठी जंगलात गेली होती. सरपण गोळा करताना सुधा चिलमवार हिच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. त्यानंतर आता गोगाव येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.