दिग्रस (जि. यवतमाळ) : दोन दिवसांपासून सुरू असलेला कमी-अधिक पाऊस व आज शुक्रवारी (ता.२४) पहाटेच्या ४ वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे दिग्रस येथील अरुणावती धरणात ९९.३६ टक्के एवढा जलसाठा जमा झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी मेन्टेन करण्यासाठी ९ दरवाज्यातुन प्रती सेकंद ३७० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र पाऊस बंद झाल्याने सकाळी १० वाजेनंतर चार दरवाजे बंद करून ५ दरवाज्यातून ११५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दोन दिवसांपासून दिग्रससह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत आहे. याच पार्श्वभूमीवर अरुणावती प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता अरूणावती विभागाकडून वर्तविण्यात आली होती. विभागाकडून धरणा शेजारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.
अशात अरुणावती धरणात शुक्रवारी (ता.२४ स्पटेंबर) सकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ९९.३६ टक्के जलसाठा निर्माण झाला. त्यामुळे धरणाचे ९ दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडण्यात आले. सकाळी १० वाजेपर्यंत या दरवाज्यातून प्रतिसेकंद ३७० क्युसेक वेगाने पाण्यचा विसर्ग करण्यात येत होता, मात्र नंतर पाऊस बंद झाल्याने या ९ पैकी ४ दरवाजे बंद करण्यात आले असून ५ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडून त्यातून ११५ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
काही दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. अद्याप पाण्याची आवक सुरूच असल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धरणाच्या जवळपास असणाऱ्या सर्वच गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अरुणावती प्रकल्प विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. धरणातील पाणी सोडण्यात आल्याने धरण पात्रात अथवा धरणाच्या पुढील भागात मासेमारी करण्यासाठी कुणीही जाऊ नये असे आवाहन देखील अरुणावती विभागाचे उपविभागीय अभियंता सागर आलाटकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.