Yavatmal News : नवजात बालिकेला बिब्याचे चटके; सतत रडते म्हणून अघोरी उपाय!

घरी नेल्यावर दोन दिवसांत मुलीला पोटदुखीचा त्रास
yavatmal five day old girl was given burn due to superstition hospital
yavatmal five day old girl was given burn due to superstition hospitalsakal
Updated on

यवतमाळ : घाटंजी तालुक्यात एका नवजात बालिकेला पोटाचा त्रास होत असल्याने पालकांनी ज्येष्ठांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून बिबा गरम करून त्याचे चटके देण्यात आले. यामुळे नवजात बालिकेची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी तिला पुढील उपचारांसाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

yavatmal five day old girl was given burn due to superstition hospital
Ashadi Wari 2023 : ‘खाकी’तील सेवेकरी; माउलींचे वारकरी

पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. जन्मानंतर मुलीची प्रकृती ठीक असल्याने घरी सोडण्यात आले. मात्र, घरी नेल्यावर दोन दिवसांत मुलीला पोटदुखीचा त्रास होत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यावेळी बालिकेला रुग्णालयात न नेता गावातील ज्येष्ठ मंडळीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून बिबा गरम करून त्याचे चटके दिले. यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी तिला पुढील उपचारासाठी यवतमाळला नेले.

yavatmal five day old girl was given burn due to superstition hospital
Yavatmal Crime News: धक्कादायक! भर रस्त्यात नगरसेवकाची निर्घृण हत्या

बिब्याचे चटके दिल्याने त्या नवजात बालिकेला पालकांनी वैद्यकीय रुग्णालयात आणले. तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांचा चमू शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

- डॉ. अजय केशवानी, बालरोग विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, यवतमाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.