Video : बघा, यवतमाळचा वाहतूक पोलिस किती हक्काने वसुली करतो... 

yavatmal trafic police
yavatmal trafic police
Updated on

झरी जामणी (जि. यवतमाळ) : वाहतूक पोलिस सामान्य नागरिकांकडून पैसे उकडण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो, प्रसंगी अनुभवतो देखील. अशीच एक घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे संबंधित वाहतूक पोलिस, सामान्य माणसांकडून जणू त्याला पैसे मागण्याचा अधिकारच असल्यासारखा वागताना दिसत आहे. 

दोन क्रुझर चालकांकडून दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलसिाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. कायद्याचे रखवालदारच असे करतील तर अपेक्षा करायची तरी कुणाकडून? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. 

दोन वर्षांपूर्वी सहायक पोलिस उपनिरीक्षक (ASI) सुधाकर जाधव यांची वणी वाहतूक पोलिस शाखेतून पांढरकवडा येथे बदली झाली. ते सध्या पांढरकवडा येथे वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. घाटंजीचे प्रशांत भोयर यांचे चुलत बंधू उमेश भोयर साक्षगंधाकरिता पांढरकवडा मार्गाने झरी जामणी तालुक्‍यातील पाटण येथे दोन क्रूजरने येत होते. पांढरकवडा शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले जाधव यांनी घाटंजी येथील दोन्ही क्रूजर वाहनींना पांढरकवडा घाटंजी मार्गावरील मारेगाव (वन) जवळ अडवले व दोन्ही चालकांना चालक परवाने मागून आपल्या खिशात ठेऊन दमदाटी केली. 

वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल 
तसेच जाधव यांनी दोन्ही चालकांकडून दोन हजार रुपयांची मागणी केली. पैशाच्या वाटाघाटी होत असताना क्रुझमधील तरूणाने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

वाहतूक पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि वाहनचालक व वाहतूक पोलिसांमध्ये होणाऱ्या वादाला आळा बसावा, यासाठी पोलिस आयुक्तांनी ई-चालान हा उपक्रम सुरू केला. मात्र, या उपक्रमालाच तडे गेले असून, हम नही सुधरेंगे, असेच काहीसे या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून अधोरेखित होते. 

वाहतूक पोलिसाकडून दोन हजार रूपयांची मांगणी करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाहतूक विभागात खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ ई सकाळच्या हाती आला असून, वाहतूक पोलिस दोन हजार रुपयाची मागणी करताना स्पष्टपणे दिसत आहे. आता जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार या प्रकारावर कारवाईचे काय आदेश देतात व पांढरकवडा विभागाचे पोलिस अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.