Yavatmal- Washim Lok Sabha 2024: जातीय समीकरण निर्णायक; भावना गवळींना सहाव्यांदा यवतमाळ-वाशिम लोकसभेची उमेदवारी मिळणार?

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसघात मराठा-कुणबी तसेच बंजारा बहुल भाग अधिक आहे. आदिवासी समाजाची मतेही निर्णायक आहेत.
Yavatmal-Washim Lok Sabha 2024
Yavatmal-Washim Lok Sabha 2024Esakal
Updated on

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसघात मराठा-कुणबी तसेच बंजारा बहुल भाग अधिक आहे. आदिवासी समाजाची मतेही निर्णायक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत जातीय समीकरणे प्रभावी ठरलेली आहेत. या मतदार संघात यवतमाळ जिल्ह्यातील चार तर वाशीम जिल्ह्यातील दोन विधानसभा या सहा मतदार संघांचा समावेश आहे. १९९९ पासूनच्या सलग पाच निवडणुकीत भावना गवळी या निवडून आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर त्या शिंदे गटात गेल्या. आता मात्र त्यांना उमेदवारीविषयी झगडावे लागत आहे.

२०१९ चे चित्र

भावना गवळी (शिवसेना) विजयी मते : ५,४२,०९८

वैशाली येडे (प्रहार) मते : २०,६२०

प्रवीण पवार (वंचित) मते : ९४,२२८

वैशाली येडे (प्रहार) मते : २०,६२०

Yavatmal-Washim Lok Sabha 2024
Beed Lok Sabha 2024: मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; पंकजा मुंडे विरूध्द शरद पवार उमेदवार देताना कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

Yavatmal-Washim Lok Sabha 2024
Raigad Lok Sabha 2024: रायगड शिवसेनेला मिळणार? महायुतीत मित्रपक्षाच्या नाराजीमुळे सुनील तटकरेंची सावध भूमिका

सद्य:स्थिती

महाविकास आघाडीतील संजय देशमुख यांची प्रचाराला सुरुवात.

भावना गवळी यावेळीही इच्छुक मात्र भाजप व शिवसेना शिंदे गटात ही जागा मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू आहे.

शिंदे गटाचेच मंत्री संजय राठोड हे भाजपकडून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मतदारसंघात १४ तालुक्यांचा समावेश असून शहरीपेक्षा ग्रामीणचा अधिक समावेश.

Yavatmal-Washim Lok Sabha 2024
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024: औरंगाबादमध्ये तिरंगी लढत चुरशीची होणार? वंचित सोबत नसल्याने एमआयएमला फटका बसण्याची शक्यता

हे मुद्दे प्रभावी ठरणार

कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, महिलांची रोजगार उद्योगाचा अभाव.

सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव.

वर्धा-यवतमाळ-नांदेड, शंकुतला रेल्वेचा लांबलेला प्रवास

यवतमाळमधील अमृत पाणीपुरवठा योजना

Yavatmal-Washim Lok Sabha 2024
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024: औरंगाबादमध्ये तिरंगी लढत चुरशीची होणार? वंचित सोबत नसल्याने एमआयएमला फटका बसण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.