Yavatmal Washim Lok Sabha Election Result : संजय देशमुख की राजश्री पाटील?

जातीय समीकरणाला छेद देणारी निवडणूक
sanjay deshmukh rajashree patil lok sabha election yavatmal washim
sanjay deshmukh rajashree patil lok sabha election yavatmal washimSakal
Updated on

२००८ मध्ये यवतमाळ-वाशिम असा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी दणदणीत विजय मिळविले आहेत. तर वाशिम लोकसभा मतदारसंघ असताना त्या १९९९ आणि २००४ मध्ये विजयी झाल्या.

शिवसेना फुटली आणि त्या शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामील झाल्या. ताई म्हणून लोकप्रिय असलेल्या भावना गवळी यांचा २०२४ च्या निवडणुकीत पत्ता कट झाला. सक्षम उमेदवार नसल्याने तिकीट कापलेले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना ऐनवेळी उभे करण्यात आले.

पाटील आडनाव सर्वकाही सांगून जाते. कारण यवतमाळमध्ये जातीय समीकरण महत्त्वाचे ठरत आले आहे. म्हणूनच काँग्रेसचे उत्तमराव पाटील सहावेळा विजयी झाले आहेत. हाच धागा पकडून राजश्री पाटील यांना पुढे करण्यात आले.

गेल्या दीड-दोन वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला. राजश्री पाटील यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही लावली. कमी वेळ मिळाला असला तरी जयश्री पाटील यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

पण, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक संजय देशमुख यांनी उभे केले. त्यांच्या मागे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभे राहिले.

जातीय ध्रुवीकरण करण्यास अपयश

या मतदारसंघात कुणबी (पाटील) आणि बंजारा समाजाची मते अधिक आहेत. त्या पाठोपाठ अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींची आहेत. २०१९ मध्ये जी समीकरणे होती, तशीच यावेळीही होती. परंतु, यावेळी जातींचे धुव्रीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे ही निवडणूक एका कुणाच्याच बाजूने झुकली नाही हे विशेष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.