आता नोटाही करता येणार निर्जंतूक, दिग्रसच्या तरुणाने बनवले उपकरण

currency
currency
Updated on

दिग्रस (जि. यवतमाळ) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. हा विषाणू कोणत्याही मार्गाने लोकांपर्यंत पोहचू शकतो. व्यवहारातील चलनाचा प्रवास कित्येक नागरिकांच्या हातातून होतो. त्याद्वारे संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. चलन निर्जंतुकीकरण उपकरणाची निर्मिती दिग्रस येथील तरुणाने केली आहे.

अमित चिद्दरवार असे या तरुणाचे नाव आहे. दिग्रस येथील दुर्गामाता चौक परिसरात त्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकान आहे. मास्टर ऑफ फाईन आर्ट (एमएफए) ही पोस्ट ग्रॅज्युएट पदवी प्राप्त केल्यानंतर तो नोकरीच्या मागे लागला नाही. गावात राहून आई-वडिलांची सेवा करता यावी, यासाठी इलेक्‍ट्रॉनिक वस्तूचे दुकान थाटले. आजच्या घडीला कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. केंद्र व राज्य सरकार लढा देत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीदरम्यान चलनाची उलाढाल होते. जीर्ण, फाटक्‍या, जुनाट नोटा चलनात फिरताना दिसतात. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयडीया
या नोटा नेमक्‍या कुणाकुणाच्या हातातून आल्या हे कोणालाच माहिती नसते. त्यामुळे कुठेही फिरणाऱ्या चलनाचे निर्जंतुकीकरण करणे क्रमप्राप्त ठरतते. अनेक कंपन्यांनी निर्जंतुकीकरणाच्या मशनरीज काढल्या असल्या तरी त्याचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. कमी खर्चात आपण काय काळजी घेऊ शकतो हे हेरून अमित याने आपल्या दुकानातील एका पुठ्ठ्याचा खोका, पाच ते सात फूट वायर, होल्डर व शंभर वॅट बल्बद्वारे कुणालाही बनविता येईल, असा सॅनिटायझर बॉक्‍स अर्थात चलन निर्जंतुकीकरण यत्र तयार केले आहे. या खोक्‍यात टंगस्टनचा बल्ब लावल्याने 65 अंश पेक्षा जास्त तापमान तयार होऊन नोटांवर असलेले विषाणू नष्ट होता. हा प्रयोग दिग्रस शहरात चर्चेचा विषय आहे.

बाजारात साहित्याची खरेदी गेल्यानंतर व्यवहारात नोटांची देवाण-घेवाण होते. जंतुसंसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टिने तयार केलेले उपकरण कमी खर्चात तयार करता येऊ शकतो. गरज ही शोधाची जननी आहे. प्रत्येकाने जमेल तशी आपली काळजी घेतली पाहिजे.
- अमित चिद्दरवार
तरुण व्यावसायिक, दिग्रस. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.