मुलगा विहिरीत तडफडत होता; त्याला वाचवण्यासाठी आई आकांत करत होती, पण नियतीनं डाव साधला

young boy drowned in a well in front of his mother
young boy drowned in a well in front of his mother
Updated on

तिवसा (जि. अमरावती) : आईसोबत शेतात गेलेला मुलगा न्याहारी करण्याकरिता पाणी लागणार म्हणून शेताशेजारी असणाऱ्या एका विहिरीवर दोघेही मायलेक पाणी आणायला गेले.  परंतु आई विहिरीतून पाणी काढत असताना विहिरीशेजारी उभा असलेला मुलगा अचानक विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्याची तडफड सुरू होती. विहिरीबाहेर असलेली त्याची आई मुलाला वाचवण्यासाठी आकांत करत होती. पण, त्यावेळी शेतात कुणीही नसल्याने नियतीने डाव साधला अन्  पोटच्या गोळ्याचा आईच्या डोळ्यांसमोरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजतादरम्यान घडली.  करण महादेव बेले (वय २२, रा. तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

करण आई व दोन शेतमजूर महिलांसॊबत शेतात गेला होता. दरम्यान शेतातील मजुरांसाठी पाणी आणायला करण आणि त्याची आई  शेजारच्या विहिरीजवळ गेले. विहिरीला खेटून उभा असलेल्या करणचा तोल गेला आणि काही कळायच्या आत तो विहिरीत  पडला. पाण्यात जोरजोरात हातपाय आदळत तो मदतीसाठी याचना करीत होता. 

मुलगा विहिरीत पडत असल्याचे पाहताच आईने त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. परंतु जवळ कुणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तिने त्याला वाचवण्यासाठी जीवाचा आकांत केला. मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही. अशातच करणचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जन्मदात्या आईसमोरच तरुण मुलाचा विहिरीत तडफडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. 

मुलाला होता मिरगीचा त्रास 

लहानपणापासून करणला मिरगी या आजाराचा त्रास होता. फिट आली की, करण जमिनीवर आदळायचा.  आज शेतातील विहिरीजवळ पाणी आणण्यासाठी आई व करण गेला असता त्याला तिथेच मिरगी आली. त्यामुळेच त्याचा तोल विहिरीत गेला व यातच करणचा दुर्दैव मृत्यू झाला.

संपादित - अतुल मांगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.