बॉयलरचा स्फोट दुर्घटनेत तरुण अभियंत्याचा मृत्यू

देसाईगंज शहरानजीकच्या जुनी वडसा येथील ए. ए. एनर्जी थर्मल पॉवर प्लॉटमध्ये गुरुवार (ता. २७) सकाळी बॉयलरचा स्फोट झाला.
boiler blast
boiler blastboiler blast
Updated on
Summary

देसाईगंज शहरानजीकच्या जुनी वडसा येथील ए. ए. एनर्जी थर्मल पॉवर प्लॉटमध्ये गुरुवार (ता. २७) सकाळी बॉयलरचा स्फोट झाला.

गडचिरोली - देसाईगंज शहरानजीकच्या जुनी वडसा येथील ए. ए. एनर्जी थर्मल पॉवर प्लॉटमध्ये गुरुवार (ता. २७) सकाळी बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. संजय सिंग (वय ३०) रा. रिवा, मध्य प्रदेश, असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तर गोवर्धन केळझरकर, रा. कुरुड व शेंडे रा. जुनी वडसा, अशी जखमी मजुरांची नावे आहेत.

गुरुवारी पहाटे अभियंता संजय सिंग पॉवर प्लांटमधील प्रॉडक्शन लाईनची पाहणी करण्यासाठी गेले होते. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास स्टीम लाईनमधील बॉयलरचा अचानक स्फोट झाला. यात संजय सिंग यांचा मृत्यू झाला. यावेळी उपस्थित मजूर गोवर्धन केळझरकर व शेंडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

ए. ए. एनर्जी प्लांट मागील काही महिन्यांपासून बंद होता. कालच तो सुरु झाला होता. मात्र, आज एका अभियंत्याला प्राण गमवावे लागले. एए एनर्जी लिमिटेडचा पॉवर प्लांट सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहीला आहे. प्रदूषण व अन्य विषयांवर नागरिकांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली आहेत. त्यामुळे या प्लांटची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.