नांदगावखंडेश्वर (जि. अमरावती) : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. नदी, नाल्यांना बऱ्यापैकी पाणी आले आहे. वाहते पाणी पाहून अनेकांना मासेमारी करण्याची इच्छा होते. तशी मासेमारी बारामाही केली जाते. मात्र, पावसाळ्यात याला जास्त वेग येतो. मात्र, अशावेळी पाण्याचा धोका न ओळखता अनेकांना जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगावखंडेश्वर येथे उघडकीस आली आहे.
शेलू गावाला लागूनच बेंबळा नदी आहे. बेंबळा नदीपात्रात दररोज तीन मित्र मासेमारीसाठी जात होते. बुधवारी तिघेही नदीपात्रात उतरले. मात्र, तिघांपैकी दोघे समोर निघून गेले तर नितीन गणपत शेंडे (वय 28) हा मागे राहिला. त्यातच नदीतील पाण्याचा जोर वाढल्याने तो वाहून गेला.
मित्र वाहून गेल्याची माहिती मित्रांनी गावातील पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी ती माहिती तालुक्यातील तहसील प्रशासन व पोलिस प्रशासनाला दिली. तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एनडीआरएफकडून गुरुवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळी ठाणेदार उदय सोयस्कर, तहसीलदार पीयूष चिवंडे, नायब तहसीलदार मोरे व गावकरी डेरे दाखल आहेत.
मुलगा वाहून गेल्याची माहिती समजताच गावात खळबळ उडाली. प्रत्येकाने बेंबळा नदीच्या दिशेने धाव घेतली. कसा वाहून गेला हाच प्रश्न प्रत्येकजण एकमेकांना विचारत होता. नितीनचा शोध एनडीआरएफकडून सुरू झालेली आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.