युवक काँग्रेसच्या अध्यक्षाकडून सहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! भाजप कार्यकर्ते आक्रमक, वडेट्टीवारांना विचारला जाब

Serious Charges Filed Against Youth Congress Leaders in Chandrapur: काँग्रेसच्यावतीने सुद्धा मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांच्यावतीने करण्यात आली.
BJP workers protesting outside the residence of Congress leader Vijay Wadettiwar demanding accountability for the alleged assault on a student.
BJP workers protesting outside the residence of Congress leader Vijay Wadettiwar demanding accountability for the alleged assault on a student.esakal
Updated on

कोरपना: कोरपना शहरातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लोंढे यांनी एका सहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर चंद्रपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला आहे. काल या प्रकरणी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चा काढण्यात आला होता.

लोंढे हे चंद्रपूरमधील एका खासगी शाळेच्या व्यवस्थापनात कार्यरत होते. तिथेच विद्यार्थिनीशी संबंधित घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर लोंढे यांना युवक काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले.

भाजप आक्रमक, वडेट्टीवारांना विचारला जाब

या घटनेच्या विरोधात आता भाजप कार्यकर्त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. भाजप युवा मोर्चाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी काँग्रेसवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर जोरदार आंदोलन केलं. त्यांनी वडेट्टीवारांना जाब विचारत, या घटनेबद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी, आंदोलकांनी आपली लढाई सुरूच ठेवण्याचं ठरवलं आहे.

काँग्रेसच्यावतीने सुद्धा मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांच्यावतीने करण्यात आली. आंदोलनात शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, शाळकरी विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

BJP workers protesting outside the residence of Congress leader Vijay Wadettiwar demanding accountability for the alleged assault on a student.
Maratha Reservation बाबत सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला

काँग्रेसचाही संताप

अत्याचार करणारा आरोपी हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. पक्षातून त्याची हकालपट्टी केली. यानंतर काल काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध मोर्चा काढून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

भाजप युवा मोर्चाने या प्रकरणात आणखी आंदोलनं करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात मोठं आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करत, भाजपने काँग्रेसला या प्रकरणात जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे.

या प्रकरणानंतर स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थीनीच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. समाजातील विविध घटकांनीही या प्रकरणाचा निषेध करत, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

BJP workers protesting outside the residence of Congress leader Vijay Wadettiwar demanding accountability for the alleged assault on a student.
Pune Crime: पुन्हा एकदा महिला अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला! पुण्यात बोपदेव घाटातून तरुणीचे अपहरण अन् ....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.