विदर्भात 'या' ठिकाणी अनुभवता येणार शून्य सावली दिवस, नेमकी सावली साथ का सोडते? जाणून घ्या कारण

zero shadow day
zero shadow daye sakal
Updated on

नागपूर : सर्वजण आपली साथ सोडतील. पण सावली नेहमीच्या आपल्यासोबत असते, असे म्हटले जाते. मात्र, महाराष्ट्रात गेल्या ३ मे पासून सावली सोडल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. तसेच ३१ मे पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी हा अनुभव घेता येणार आहे. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. मात्र, सावली अशी अचानक आपली साथ का सोडते? असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल.

zero shadow day
सहा महिन्यापासून रेशनच्या धान्यासाठी 'त्यांची' वणवण; अधिकारी देतात सतत हुलकावणी

नेमकी का गायब होते सावली?

पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितीजावरची जागा बदलत असते. २३ डिसेंबर ते २१ जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते, तर त्यानंतर दक्षिणायन सुरt होते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज ५० अंश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यावेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावलीबरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.

विदर्भात कधी घेता येणार शून्य सावली दिवसाचा अनुभव?

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक असणार आहे. त्यामुळे राज्यात 3 मे पासून शून्य सावली दिवसांचा अनुभव घेता येत आहे. १७ मे रोजी विदर्भातील अहेरी, अल्लापली येथे हा दिवस सर्वप्रथम अनुभवता येणार आहे. याशिवाय विदर्भात १७ मे २७ मे पर्यंत या दिवसाचा आनंद घेता येणार आहे. प्रत्येक शहरासाठी विविध दिवशी आणि वेळी शून्य सावली अनुभवता येणार आहे.

zero shadow day
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी अन् उन्हाळी परीक्षांची तारीख ठरली, लवकरच वेळापत्रक जाहीर

विदर्भात 'या' ठिकाणी घेता येईल अनुभव -

विदर्भात १७ मे रोजी अहेरी, आल्लापल्ली, १८ मे मुलचेरा, १९ मे पुसद, बल्लारशा, चामोर्शी, २० मे चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, २१ मे चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, २२ मे बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी, २३ मे खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रह्मपुरी, नागभीड, २४ मे शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर, २५ मे अमरावती, तेल्हारा, २६ मे नागपूर, भंडारा, परतवाडा, २७ मे परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, 28 मे वरुड,नरखेड येथे शून्य सावली अनुभवता येणार आहे.

'या' वेळेत करावे सूर्याचे निरीक्षण -

दुपारी १२ ते १२.३५ या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. जेणेकरून तुम्हाला शून्य सावली दिसू शकते असे स्काय वाच ग्रुपचे अघ्यक्ष आणि खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()