जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जगासमोर ठेवला नवा आदर्श..केले 'हे' कौतुकास्पद काम...  

ZP school teachers took admission of their children in ZP school
ZP school teachers took admission of their children in ZP school
Updated on

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : आजच्या या मॉडर्न युगात प्रत्येक जण इंग्रजी भाषेतील शिक्षणाकडे आकर्षित होत चालला आहे.  आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घ्यावे अशी इच्छा पालकांची आहे. त्याकाळी परिस्थितीमुळे आम्हाला शिक्षण घेता आले नाही मात्र आमच्या पाल्यांनी शिकून भरपूर मोठे व्हावे असे बहुतांश पालकांचे म्हणणे आहे. अर्थात त्यात काही वावगंही नाही. मात्र यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

एकेकाळी शिक्षणाची ज्ञानधारा जिथून वाहत होती त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आज शांत आहेत.  अनेक विद्यार्थी हे मराठी शाळेत शिकूनच आज मोठ्या पदावर असल्याचे पाहायला मिळतात. त्यांच्या तोंडूनसुद्धा मराठी शाळेचे कौतुक ऐकायला मिळते. मात्र आपल्या पाल्याना शाळेत दाखल करताना त्यांना मराठी जिल्हा परिषदैच्या शाळेचा विचारसुद्धा येत नाही.  

इतकेच नाही तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकसुद्धा  आपल्या पाल्यांना इतर शाळांमध्ये दाखल करतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कौतुकास्पद काम करून इतर सर्व शिक्षकांना नवी प्रेरणा आणि संदेश देण्याचे काम केले आहे.   

स्वतःच्या मुलांना केले दाखल

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा येथील शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. शिक्षक संजय पंचभाई यांनी आपल्या मुलाला पहिल्या वर्गात दाखल केले. तर सहाय्यक शिक्षक गुलाब राठोड यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात दाखल केले. 

पालकांच्या घेतल्या भेटी

पालकांशी सातत्याने संपर्क साधून शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गुप्ता , शाळाव्यास्थापन समिती अध्यक्ष तोहीद शेख , शाळेचे सर्व शिक्षक , समिती सदस्य यांनी पालकांच्या भेटी घेऊन शाळेचे उपक्रमांची माहिती देऊन पहिल्या वर्गात तब्बल 17 विद्यार्थी दुसरी मध्ये 2 , तिसरी मध्ये 5, चौथी मध्ये 1 तर पाचवीमध्ये 3 असे एकूण 28 विद्यार्थाना नव्याने दाखल केले. 

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तत्पर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी शाळेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे यांनी केले तर विविध उपक्रमाबाबत विस्तार अधिकारी रवींद्र लहमागे केंद्रप्रमुख केवळराम तोडे मार्गदर्शन करीत आहेत.     

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.