Ashok Saraf Interview: लक्ष्याचा सर्वात बेस्ट रोल कोणता ? अशोक मामांनी केली या सिनेमाची निवड, रिमेक बद्दल स्पष्ट सांगितलं

Ashok saraf interview about remake of ashi hi banva banvi: सकाळ सामला नुकताच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी अशी ही बनवा बनवी या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "३५ वर्षे झाली तरी लोक अजूनही 'बनवा बनवी' चित्रपट बघत आहेत. या चित्रपटाने एक वेगळा इतिहास घडवला आहे.

Ashok saraf about remake of ashi hi banva banvi: सुपरस्टार अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. विनोदी असो वा गंभीर, प्रत्येक भूमिकेत त्यांनी जीव ओतून काम केलं आहे. तरीही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवा बनवी'.

सकाळ सामला नुकताच दिलेल्या मुलाखतीतअशोक सराफ यांनी अशी ही बनवा बनवी या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "३५ वर्षे झाली तरी लोक अजूनही 'बनवा बनवी' चित्रपट बघत आहेत. या चित्रपटाने एक वेगळा इतिहास घडवला आहे. हा चित्रपट अत्यंत वेगळा आहे आणि सर्वत्र सतत बघितला जातो. याचं कारण म्हणजे त्यातला उत्कृष्ट कन्टेन्ट. लेखक वसंत सबनीस यांनी अशी कॉमेडी लिहिली आहे की, अशा लेखकाचा पुनरागमन होणे नाही. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली चौघांची धडपड अप्रतिम आहे. दिग्दर्शक सचिन यांनी त्या कॉमेडीला उत्तम प्रकारे सादर केलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या भूमिकेत जे काही केलं ते अविस्मरणीय आहे, मला वाटतं त्याच्या आयुष्यातील सगळ्यात चांगली भूमिका तीच आहे. सचिन तर इतका सुंदर कधीच दिसला नव्हता.

Ashok Saraf Interview
Ashok Saraf: 'अशी ही बनवा बनवी'चा रिमेक बनवावा का? अशोक सराफ यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले- तो चित्रपट म्हणजे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.