Baramati vidhan sabha: निवडणूकीचं वातावरण तापलं, युगेंद्र पवार आणि जय पवार कामाला लागले

युगेंद्र पवारांनी कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन घेत स्वाभिमानी यात्रेला केली सुरुवात, तर जय पवारांकडून गणपती मंडळांना भेटी देत प्रचाराचा धडाका

बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा अटीतटीची मानली जाते. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांचे नाव चर्चेत आहे. तर अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवार किंवा मुलगा जय पवार मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान उमेदवार निश्चीत होण्याआधी दोन्ही पक्षाकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. युगेंद्र पवार आणि जय पवार या दोन्ही पवार बंधूंनी बारामतीत निवडणुकीचा श्रीगणेशा केला. युगेंद्र पवारांनी कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन घेत स्वाभिमानी यात्रेला सुरुवात केली. तर जय पवारांनी गणपती मंडळांना भेटी देत प्रचाराचा धडाका लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...