Chitra Wagh: संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ का शांत झाल्या? स्वत:च सांगितलं कारण....

Chitra Wagh's Statement on Sanjay Rathod Case: मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. वाघ यांच्यासारखे राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत असून न्यायालयांना त्यात विनाकारण ओढत आहेत, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. पुणे येथे फेब्रुवारी २०२१ मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून झालेल्या तरुणीच्या कथित मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ यांनी तीन वर्षांपूर्वी जनहित याचिका केली होती.

मात्र, ही याचिका न्यायालयाने निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी वाघ यांनी बुधवारी केल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या बदललेल्या भूमिकेचा समाचार घेतला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने वाघ यांच्यावर ताशेरे ओढले.

Chitra Wagh
Jayant Patil-Amol Kolhe: जयंत पाटील अन् अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले, थरारक घटनेचा VIDEO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.