शेतकऱ्याचा मुलगा ते थेट मुश्रीफ अन् घाटगेंसारख्या दिग्गजांना विधानसभेच्या रिंगणात भिडणारा... कुणाच्याही पाठबळावर नाही तर स्वकर्तृत्वावर आमदारकीची उमेदवारी मिळवणारा हा तरुण उमेदवार नेमका कोण? त्याचा परिचय नेमका काय आहे?, जाणून घेऊयात-
येत्या विधानसभेला मनसेसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कागल मतदारसंघातून राज ठाकरेंनी २७ वर्षीय रोहन निर्मळ या युवा चेहऱ्याला संधी दिलेली आहे. हा युवा चेहरा प्रस्थापितांविरुद्ध लढणार आहे. त्यामुळे त्याची ओळख करुन घेऊयात-
रोहन निर्मळ मूळ कागलचेच. कागल तालुक्यातील हमिदवाडा गावात राहतात. २८ नोव्हेंबर, १९९७ चा जन्म. शिक्षण सांगायचं झालं तर, कला शाखेतून पदवीधर झालेले अन् सामाजिक कार्याची आवड. राजकीय प्रवासाबाबत सांगायचं झालं तर, मनसे पक्षातूनच सुरुवात केली अन् त्याचंच फळ त्यांना २०२४ च्या आमदारकीच्या उमेदवारीतून मिळालेलं दिसतंय.
१८ ऑगस्ट २०१७ रोजी मनसे पक्षात प्रवेश
२० नोव्हेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर पदी निवड
२५ जून २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कोल्हापूर जिल्हा चिटणीस पदी निवड
२०२२ साली पार पडलेल्या हमिदवाडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुविद्य पत्नी सौ. सारिका निर्मळ यांना भरघोस मतांनी निवडून आणले.
1. प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी कोल्हापूर येथे झालेल्या उपोषणामध्ये सहभाग.
2. कागल पंचतारांकित एमआयडीसीमधील कामगारांच्या विविध समस्यांवर आवाज उठवला आणि न्याय मिळवून दिला.
3. कोणतेही संविधानिक पद नसताना विकास कामांसाठी ८० लाखाचा निधी मंजूर करून आणला.
4. कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मॅनेजमेंट संस्थेकडून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवली आणि न्याय मिळवून दिला.
5. गोकुळने केलेल्या दूध दर कपातीसंदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खळ्ळखट्याक आंदोलन छेडले. आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
6. कोविड काळात स्वतःची गाडी ॲम्बुलन्सप्रमाणे वापरून रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवल्या.
7. कागल तालुक्यातील अनेक गावात आरोग्यविषयक अनेक मोफत शिबिरं राबवली.
8. देवगड निपाणी येथे होणाऱ्या महामार्गामधील भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवला.
त्यामुळे आतापर्यंत आरोग्य, शिक्षण, कला आणि क्रीडा, पर्यावरण, आपात्कालीन संकटं, सामाजिक भान, स्त्री सुरक्षा अशा अनेक विषयांवर काम करत रोहन निर्मळ यांनी प्रत्येक विषयाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ‘नेतृत्व हे कर्तृत्वावर ठरते, वारसावर आणि पैशावर नाही’ हे रोहन निर्मळ यांनी आतापर्यंत केलेल्या कामातून दिसून येते. त्यामुळे कागलमध्ये रोहन निर्मळ कशी निवडणूक लढवतात? घाटगे अन् मुश्रीफांना कशी टक्कर देतात? हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.