Keshavrao Bhosale Natyagruha: 'तेच नाट्यगृह जळून खाक झालं..' कोल्हापूरचा लाडका भरत जाधव झाला भावुक

Bharat Jadhav नाट्यगृह जळणे ही घटना अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी आहे. आज पर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात चिरंतर राहतील.'

कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचे हजारो प्रयोग हाऊसफुल झाले होते. मात्र, हेच नाट्यगृह आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडून राख झाले आहे. या घटनेबद्दल भरत जाधव यांनी नाट्यगृहाचा एक फोटो शेअर केला आणि म्हणाले, 'अतिशय दुःखद घटना... संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे माझ्या सर्वात आवडत्या नाट्य गृहांपैकी एक. नुकत्याच माझ्या "अस्तित्व" या नाटकाला "महाराष्ट्र राज्य मराठी व्यवसायिक नाट्य स्पर्धेची" भरपूर बक्षिसे मिळाली. या नाटकाची रंगीत तालीम मी याच नाट्यगृहांमध्ये काही महिन्यांपूर्वी केली होती. नाट्यगृह जळणे ही घटना अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी आहे. आज पर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात चिरंतर राहतील.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.