नेरळमध्ये खुलेआम गुंडगिरी सुरु असल्याचा एक व्हिडीओ ठाकरे गटाकडून ट्विट करण्यात आला होता. या व्हिडीओत एका व्यक्तीला भररस्त्यात स्टिकनं मारहाण होताना दिसत आहे. ठाकरे गटानं केलेल्या ट्विटमध्ये मारहाण करणारा व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा 'शिवा' नावाचा बॉडीगार्ड असल्याचं म्हटलं गेलं.. दरम्यान, महेंद्र थोरवे यांनी ते नाकारलं. याउलट ज्याला मारहाण झाली तो आपला नातेवाईक आहे. आणि ते दोन्ही आमचेच कार्यकर्ते असल्याचंही म्हंटलं आहे. पण हे मारहाण प्रकरण म्हणजे ठाकरे गटाकडून मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा प्रत्यारोपही आमदार महेंद्र थोरवेंनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.