Sunil Shelke: मावळवरुन महायुतीमध्ये फुट? Ajit Pawar गटाच्या शेळकेंविरोधात भाजपची आक्रमक भूमिका

Maval Assembly constituency: मावळमध्ये नकुत्याच झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात सुनील शेळके यांचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. सर्वच पक्षातील ईच्छुक तिकीट मिळावे यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत.

विधानसभा निवडणुक महायुती एकत्र लढणार अशी घोषणा केली असली तरी जागावाटपावरून पक्षांमध्ये खटके उडताना पहायला मिळत आहेत.मावळमध्ये अजित पवार गटाचे सुनील शेळके आमदार आहेत. मात्र या विधानसभेच्या जागेवर भाजप दावा करत आहे. भाजपच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी शेळकेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान मावळचे भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना आतापासूनच विरोध करण्यास सुरूवात केली आहे. मावळमध्ये नकुत्याच झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात सुनील शेळके यांचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()