ST Strike News: एसटी कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे पण, श्रेयवादाच्या लढाईत गोंधळ

ST Strike Update: एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट ६५०० रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत झाला. या निर्णयानंतर एसटी कर्मचारी कृती समितीने आपला संप मागे घेतला. त्यानंतर सदावर्ते अन् एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली पाहायला मिळाली.

ST Strike News: एसटी कर्मचारी संघटनेची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ४ सप्टेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट ६५०० रुपयांची पगारवाढ करण्यात आली. या निर्णयानंतर एसटी कर्मचारी कृती समितीने आपला संप मागे घेतला. त्यानंतर सदावर्ते अन् एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली पाहायला मिळाली. एसटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी माध्यमांना प्रतिक्रिया देत असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे तिथे काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. तरी, एसटी कामगारांनी संप मागे घेतल्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार नाहीत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.