Uddhav Thackeray News: दिल्ली दौरा फळाला, मविआची मोठी जबाबदारी?

Mahavikas Aghadi News: मविआकडून उद्धव ठाकरेंना प्रचार प्रमुख जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळतंय.

Uddhav Thackeray Big Responsibility in Mahavikas Aaghadi's Future:

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असतील. उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आताच जाहीर होणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलं जाणार. तरी, महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती प्रचाराची सूत्रं देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडनं घेतल्याची माहिती मिळतेय. सोबतच INDIA आघाडीत असणाऱ्या इतर छोट्या पक्षांनादेखील आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्याचंही कळतंय. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानं ही मोठी बातमी साम टीव्हीनं दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.