Akole Vidhansabha Constituency: आदिवासी बहुल असलेला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका.. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघावर ४० वर्षे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निर्विवाद वर्चस्व होते.. मात्र पिचड, यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केल्याने २०१९ साली आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात शरद पवारांनी डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली.. अकोले मतदारसंघात शरद पवारांनी विशेष लक्ष घातले आणि पिचड यांच्या सर्व विरोधकांची मोट बांधण्यात ते यशस्वी झाले.. या निवडणुकीत मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांचा पराभव करत डॉ. किरण लहामटे आमदार झाले.. सत्ता नाट्यानंतर आमदार किरण लहामटे यांनी देखील शरद पवारांची साथ सोडत ते अजित पवार यांच्या गोटात दाखल झालेत.. शरद पवार आता अकोले मतदारसंघात नवीन उमेदवाराच्या शोधात असून अकोले तालुक्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांचा मुलगा अमित भांगरे याची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.. तर महायुतीत असल्याने भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांची राजकीय अडचण झाली आहे.. पिचड आणि लहामटे यांचे राजकीय वैर तालुक्यातील जनतेला सर्वश्रुत आहे.. त्यामुळे निवडणूक लढवणारच असा निर्धार वैभव पिचड यांनी केल्याने ते इतर पर्यायांची चाचपणी करत आहेत.. एकंदरीतच अकोले विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होणार हे निश्चित असले तरी पिचड यांच्या भूमिकेकडे देखील मतदारांचे लक्ष लागले आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.