Rahul Gandhi News: वायनाड सोडून राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं? जाणून घ्या ५ कारणं...

काँग्रेस नेते राहुल गांधींनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला. तो म्हणजे ते वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून साडेतीन लाखाहून अधिक मताधिक्य घेत निवडून आले. पण त्यातला एकच मतदारसंघ ठेवायचा होता. यावेळी राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेली लोकसभा मतदारसंघाचं खासदार राहणं पसंत केलं. त्यामागे काँग्रेसची काय रणनीती असू शकते, जाणून घ्या ५ मुद्द्यांमधून...

काँग्रेस नेते राहुल गांधींचा आज वाढदिवस आहे. दरम्यान, नुकताच राहुल गांधींनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला. तो म्हणजे ते वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून साडेतीन लाखाहून अधिक मताधिक्य घेत निवडून आले. पण त्यातला एकच मतदारसंघ ठेवायचा होता. यावेळी राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेली लोकसभा मतदारसंघाचं खासदार राहणं पसंत केलं. त्यामागे काँग्रेसची काय रणनीती असू शकते, जाणून घ्या ५ मुद्द्यांमधून...

आता राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीच का निवडलं? ते समजून घेण्यासाठी आपल्याला ५ वर्ष मागे जावं लागेल. ते म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत... खरंतर २०१९ मध्ये राहुल गांधी दोन मतदारसंघांमधून लोकसभा निवडणूक लढले. एक म्हणजे वायनाड जो त्यांचा हक्काचा अन् काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. दुसरा म्हणजे अमेठी जिथून भाजप नेत्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केला होता.

पण आता ५ वर्षांनी राहुल गांधींनी अमेठीत स्मृती इराणींविरुद्ध वेगळाच डाव केला. तो म्हणजे पहिला तर तो मतदारसंघ सोडला अन् दुसरं म्हणजे राहुल गांधींनी अमेठीतून आपल्या एका कट्टर समर्थकाकडून इराणींचा पराभव केला अन् स्वत: रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले. आणि इथून ३ लाख ९० हजाराच्या फरकानं जिंकून आले. त्यामुळे २०१९ आणि आता २०२४ मध्ये भक्कम साथ देणारा वायनाड मतदारसंघ राहुल गांधींनी सोडून रायबरेलीचा का विचार केला असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Rahul Gandhi News
Rahul Gandhi Fitness: राहुल गांधी निरोगी अन् तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करतात 'असे' रूटीन

१.      काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा बळकवण्याचा प्रयत्न

रायबरेली हा मतदारसंघ येतो उत्तर प्रदेशात. यंदा काँग्रेसला इथून ६ जागांवर विजय मिळवता आला आहे. मागील म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त रायबरेलीतून विजय मिळाला होता. पण, यंदा इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात एकूण ४३ जागांवर विजय मिळाला आहे, त्यात समाजवादी पक्षाला ३७ जागांवर विजय मिळाला. तर, २०१९ मध्ये एनडीएनं ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र चित्र उलटं आहे. एनडीएला फक्त ३६ जागांवर आपले खासदार निवडून आणता आलेत. त्यातले भाजपचे ३३, राष्ट्रीय लोक दलाचे २ आणि अपना दल यांचा एक खासदार निवडून आला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाची साथ काँग्रेसच्या चांगलीच पथ्यावर पडलेली दिसली. आणि सपासोबत काँग्रेसच्या मतांची टक्केवारीही यंदाच्या निवडणुकीत वाढलेली दिसली.

२०२९ ला ही मतांची टक्केवारी वाढू शकते असा काँग्रेस श्रेष्ठींना विश्वास आहे. त्यातच देशात सत्तास्थापनेसाठी उत्तर प्रदेश महत्वाचं राज्य आहे. कारण या राज्यातून सर्वाधिक खासदार संसदेत जातात. त्यामुळे या राज्यावर आपला प्रभाव असावा या हेतूनं काँग्रेस पक्षानं राहुल गांधींसाठी रायबरेली मतदारसंघ निवडला असावा असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

२.      शंभरी लाभली, आक्रमकता आली

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला देशभरात चांगलं यश मिळालं. काँग्रेस पक्षाला शंभरी ओलांडता आलेली नसली तरी, काँग्रेस पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी चांगला कल दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. कायम संयमी असणारी काँग्रेस आता मात्र आक्रमक झालेली दिसत आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेसनं रायबरेली मतदारसंघ ठेवून एकप्रकारे हे पहिलं पाऊल उचललं असेल, असं मानलं जातंय.

महाराष्ट्रात काँग्रेसला ४८ पैकी १३ जागा मिळाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील यशामुळेही काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे संयमी काँग्रेस आता मोदी आणि एनडीएविरुद्ध आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. त्यामुळे भाजपशी दोन हात करण्यासाठी रायबरेलीसह उत्तर प्रदेशात आपलं स्थान टिकवून ठेवण्याची गरज काँग्रेस पक्षाला वाटत असावी, अशीही चर्चा आहे.

Rahul Gandhi News
Rahul Gandhi News : पंतप्रधान मोदींचे जम्मूतील हल्ल्यांकडे दुर्लक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप

३.      उत्तर प्रदेश का हवा?

खरंतर आधी सांगितल्याप्रमाणे, संसदेत सत्ता हवी असेल तर त्यासाठी आपल्याला यूपीतून जाता येतं. म्हणजे केंद्रातल्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असं वक्तव्य कायम राजकीय वर्तुळात केलं जातं. कारण उत्तर प्रदेशात जो पक्ष बलवान, त्याची केंद्रात सत्तेत येण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास तसा सांगतो. त्यामुळे आता २०२४ तर गेली, पण २०२९ ला देशात, केंद्रात सत्तापालट करायचा असेल तर काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात आपलं ठाण मांडणं अत्यंत महत्वाचं आहे.

त्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या ६ जागासुद्धा काँग्रेस पक्षासाठी सकारात्मक चित्र असल्याचं बोललं जातंय. कारण त्यांच्यासोबत असणाऱ्या समाजवादी पक्षानं भाजपला मागे सारत ३७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सक्षम साथीदारासोबतच पक्षसंघटन वाढवण्यासाठी आणि २०२९ ला म्हणावा असा, पक्षाला अपेक्षित असा निकाल अन् केंद्रात सत्तापालट पाहण्यासाठी उत्तर प्रदेश हवा असल्याचं बोललं जातंय.   

४.      काँग्रेसला ‘हार्टलँड’ जिंकावा लागणार

२०२९ ला काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत सेंच्युरी गाठली. तुम्ही म्हणाल ९९ जागा जिंकल्या आहेत. पण सांगलीची एक जागा जी विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून लढली, त्यांनीही पुढे काँग्रेसलाच समर्थन दिलं. त्यामुळे काँग्रेसची सेंच्युरी झाली म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता येऊयात मुद्द्यावर काँग्रेसला हार्टलँड जिंकावा लागणार.

हार्टलँड म्हणजे हिंदी भाषिकांची राज्यं काँग्रेसला आपल्या ताब्यात घ्यावी लागतील म्हणजे तिथे आपल्या पक्षाला मजबूत करावं लागेल. त्यात कोणती राज्य येतात तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, राजस्थान यामध्ये काँग्रेसला आपलं वर्चस्व सिद्ध करावं लागेल. त्यासाठीच उत्तर प्रदेशात राहुल गांधींना पुढे केलं जात असावं, अशी चर्चा आहे.

Rahul Gandhi News
Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या विजयाने राहुल गांधी झाले मालामाल; 3 दिवसांत केली लाखो रुपयांची कमाई

५.      वायनाडचा बालेकिल्ला प्रियंका गांधी शाबूत ठेवणार

केरळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यंदा केरळातून २० पैकी १४ जागांवर काँग्रेसचे खासदार जिंकून आलेत. तर, काँग्रेसचा सहकारी असलेल्या IUML म्हणजे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे २ खासदार आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा इंडिया आघाडीचं इथे वर्चस्व आहे. त्यातच २ वर्षांनी केरळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी जरी वायनाड सोडलं तरी २०२६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्तेत येईल अशी पक्षश्रेष्ठींना आशा आहे. तर

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रियंका गांधींना या जागेवरुन लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरवून ही जागा काँग्रेसच्याच ताब्यात ठेवण्याचा काँग्रेसचा डाव आहे. त्यामुळे प्रियंका गांधींच्या केरळातील एन्ट्रीचाही काँग्रेस पक्षाला २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com